AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कोलंबोत होणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. खरं तर गॉल कसोटी सामना जिंकणं सोपं नव्हतं. पण भारतीय संघाने करून दाखवलं. आता कोलंबो कसोटी जिंकणं सोपं असल्याचं दिसत आहे.

IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 20, 2026 | 5:54 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवणं भाग आहे. गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर नमवलं. तसेच देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे संघाला मोठी साथ मिळाली. हा सामना भारताने 165 धावांनी जिंकला. तसेच दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता भारताकडे कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची मोठी संधी आहे. हा कसोटी सामना कोलंबोत होत असल्याने भारतीय संघाच्या आशा वाढल्या आहेत. कारण मागच्या 15 वर्षात भारतीय संघाने या मैदानात एकही सामना गमावलेला नाही.

कोलंबोच्या एसएससीमध्ये भारताची कामगिरी कशी?

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका हे दोन संघ सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये 23 ऑगस्टला भिडणार आहेत. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असल्याने दोन्ही संघ जोर लावणार यात काही शंका नाही. हा सामना ड्रॉ किंवा भारताने जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण श्रीलंकेने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघाला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने गॉल कसोटी सामन्यात विजय मिळवल्याने आशा वाढल्या आहेत. कोलंबोत विजयी पताका फडकवण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. त्यात सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानात भारताची कामगिरी जबरदस्त आहे. 2010 पासून आतापर्यंत भारताने एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

2010 पासून आतापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर तीन कसोटी सामने पार पडले. यात पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. तर उर्वरित दोन सामन्यात भारातने मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताला या मैदानात शेवटचा पराभव 2008 मध्ये सहन करावा लागला होता. या मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 9 कसोटी सामने खेळले गेलेत. त्यात 3 सामने भारताने, तर 2 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर चार सामने ड्रॉ झाले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ