AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी, तुकाराम मुंढे यांची घोषणा..

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मोठे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. थेट सुट्ट्या तेलावर त्यांनी राज्यात बंदी घातली. यासोबतच त्यांनी मोठे आवाहनही केले.

राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी, तुकाराम मुंढे यांची घोषणा..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 20, 2026 | 5:53 PM
Share

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही मोठे निर्णय घेतले. राज्यभरात मोठे धाडसत्र सुरू आहे. अ‍ॅनालॉग पनीरवर त्यांनी बंदी आणली. यासोबतच मुंबई महापालिकेतील शाळांचा कँटीनमधील मेन्सू बदलला आहे. भेसळखोरांचा धाबे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने दणाणली आहेत. त्यामध्येच आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत काम करत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. एडिबलं ऑईलबद्दल हा आदेश असल्याचे सांगत तुकाराम मुंढे यांनी महत्वाचा मुद्द आपल्या हातात घेतला आहे. खाद्य तेलावर आता काम केले जाईल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. राज्यात आता सुट्ट्या तेलावर बंदीचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिली आहेत.

तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, नोंदणी न केलेल्या खाद्य तेल कंपन्या आम्हाला मिळाल्या आहेत. खाद्य तेलात भेसळ केली जातंय. मोहरी तेल अनधिकृत मिश्रण केले जातंय, ज्याची परवानगी नाही. खाद्यतेलाची विक्री सुट्ट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम अगोदरपासून आहे. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे तेल विक्री करू नये, असे आवाहन तुकाराम मुंढे यांच्याकडून करण्यात आले.

मोहरीचे तेल 100 टक्के मोहरीचे विकावे लागेल. त्यात मिश्रण अजिबात चालणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. पॅकेजिंग खाद्य तेलाची विक्री केली जाईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुट्टे तेल मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. मुळात म्हणते ते तेल कुठू येते याचा स्त्रोत माहिती नाही. ते सुरक्षित नाही. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता आहे. तळणीचा तेलाचा वारंवार वापर केला जातो. हॉटेल्समध्ये हे मोठ्या प्रमाणात होते.

त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, आता हे करता येणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले. खाद्यतेलाच्या वापरांचे उल्लंघन केल्यास आता 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यासोबतच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर 10 लाखापर्यंत दंड लागू शकतो. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी सुट्टे तेल न खरेदी करण्याचे मोठे आवाहन केले. यासोबतच नागरिकांनी सुट्टे तेल खरेदी करू नये, असेही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.

Follow Us
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंबाझरी तलावाची पाहणी, नागपूरच्या वैभवाल
अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप