AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar | ‘अंत्यसंस्कारासाठी लाकडं जमवली…’, नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

Nana Patekar | स्वत:च्या अंत्यसंस्कारासाठी नाना पाटेकप यांनी जमवली लाकडं, असं का केलं?; नाना पाटेकर यांच्या विधानाने खळबळ... नाना पाटेकर कामय त्यांच्या सिनेमांमुळे आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत असतात. पण आता नाना पाटेकर स्वतःच्या वक्तव्यामुळे तुफान चर्चेत...

Nana Patekar | 'अंत्यसंस्कारासाठी लाकडं जमवली...', नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
| Updated on: Sep 15, 2023 | 4:02 PM
Share

मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | अभिनेते नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नाना पाटेकर यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहत असतात. आता नाना पाटेकर लवकरच दिग्दर्शिक विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान, नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं, नाना पाटेकर फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, परखड वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर नाना पाटेकर स्वतःचं मत मांडत असतात. एवढंच नाही, अनेक चाहते नाना पाटेकर यांच्या मताचा, वक्तव्याचं समर्थन देखील करतात.

नुकताच झालेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर यांचा मृत्यूवर विश्वास आहे. मृत्यूनंतर नाना पाटेकर यांना १२ मन लाकडं लागतील असं वक्तव्य खुद्द त्यांनी एका मुलाखती दरम्यान केलं आहे. एवढंच नाही तर, ‘हिच माझी खरी संपत्ती…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले..

नाना पाटेकर म्हणाले, ‘मी माझ्यासाठी १२ मन लाकडं ठेवली आहेत आणि कोणताच लाकूड ओला नाही. माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडं वापरू नका, नाही तर सर्वत्र धूर होईल. जे पाहुणे आणि मित्रमंडळी तेथे उपस्थित असतील त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. अशात अनेकांचा गैरसमज होईल की, जमलेले सगळे माझ्यासाठी रडत आहेत…’

पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘माझ्या निधनाच्या वेळी कोणता गैरसमज नको अशी माझी इच्छा आहे. तुमचं निधन होईल, पण कोणी तुम्हाला २ – ४ दिवस देखील आठवणीत ठेवणार नाही. माझ्या निधनानंतर माझा फोटो देखील नका लावू. मला पूर्णपणे विसरून जा… तेच अत्यंत महत्त्वाचं आहे…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

भावंडांबद्दल नाना पाटेकर म्हणाले, ‘आम्ही सात भावंडं होतो. सर्वांचं निधन झालं आहे. मी एकटाच आहे. आई वडील, भाऊ बहीण आता कोणी नाही. आता मी या जगात एकटा आहे.’ सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, रायमा सेन, निवेदिता भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.