प्रभासशी अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सनॉनने बोलून दाखवली ‘ही’ मोठी इच्छा; चाहते खूश!

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 27, 2022 | 8:40 AM

क्रिती सनॉन प्रभासला करतेय डेट? वरुण धवनने बोलता बोलता दिली मोठी हिंट

प्रभासशी अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रिती सनॉनने बोलून दाखवली 'ही' मोठी इच्छा; चाहते खूश!
Prabhas and Kriti Sanon
Image Credit source: Twitter

मुंबई: अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचदरम्यान क्रितीच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि क्रिती यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत. हे दोघं लवकरच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अफेअरच्या चर्चांदरम्यान क्रितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चक्क प्रभासशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

‘आदिपुरुष’च्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं, अशी चर्चा होती. ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्याचंच उत्तर देताना तिने प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘टायगर श्रॉफ, प्रभास आणि कार्तिक आर्यन या तिघांपैकी तू कोणासोबत फ्लर्ट, डेट आणि लग्न करू इच्छितेस’, असा प्रश्न क्रितीला एका मुलाखतीत विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “कार्तिक आर्यनसोबत फ्लर्ट करेन, टायगरला डेट करेन आणि प्रभासशी लग्न करेन.” इतकंच नव्हे तर ऑनस्क्रीन आम्ही दोघं खूप चांगले दिसतो, असंही ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण देण्यासाठी यावेळी वरुण धवननेही क्रितीची पोलखोल केली. तिच्या लव्ह-लाइफविषयी सांगताना वरुण म्हणाला की ती एका उंच ‘शहजादा’ला डेट करतेय, जो तिला परफेक्ट सूट होतो.

प्रभाससोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, असं विचारलं असताना तिने सांगितलं, “शूटिंगदरम्यान मी प्रभासला हिंदी भाषा शिकवली, तर त्याने मला काही तेलुगू डायलॉग शिकवले.”

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने राम तर क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. याआधी प्रभासचं नाव अनेकदा ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीशी जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांनी वारंवार या चर्चा नाकारल्या होत्या.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI