लोकप्रिय अभिनेत्रीसोबत शाहरुख खानचे प्रेमसंबंध, गौरीला कळल्यानंतर वाद घटस्फोटापर्यंत गेले तेव्हा…

Shah Rukh Khan: जिच्यासोबत गौरीची होती मैत्री, त्याच अभिनेत्रीसोबत जुळले शाहरुख खानचे प्रेमसंबंध, कळताच किंग खानच्या पत्नीला बसला मोठी धक्का आणि वाद घटस्फोटापर्यंत गेले तेव्हा..., कोणी समोर आणलं मोठं रहस्य?

लोकप्रिय अभिनेत्रीसोबत शाहरुख खानचे प्रेमसंबंध, गौरीला कळल्यानंतर वाद घटस्फोटापर्यंत गेले तेव्हा...
फाईल फोटो
| Updated on: Sep 17, 2025 | 2:30 PM

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटींचे अफेअर्स कायम चर्चेचा विषय असतो. अनेक सेलिब्रिटी लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आले. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता शाहरुख खान याचं नाव अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत जोडण्यात आलं. दरम्यान, प्रियांका आणि गौरी यांची चांगली मैत्री देखली झाली होती. पण शाहरुख आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल कळल्यानंतर गौरीने प्रियांकासोबत काम करायचं नाही… असं किंग खानला बजावलं. एवढंच नाही तर, शाहरुख आणि गौरी यांचे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचले असं देखील अनेक समोर आलं होतं.

आता जाहिरातींचे बादशाह म्हणून ओळख असलेल्या प्रल्हाद कक्कड यांनी शाहरुख खान प्रियांका चोप्रा यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘एक काळ असा होता जेव्हा प्रियांका हिचं नाव शाहरुख खान याच्यासोबत जोडलं जात होतं. पण अभिनेत्री कधीच किंग खान नाव घेत नात्याची कबुली दिली नाही.’ सांगायचं झालं तर, डॉन (2006) आणि डॉन 2 (2011) सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुख आणि प्रियांका यांच्यातील नातं चांगलं झालं.

प्रल्हाद कक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियांका चोप्रा ही एक अतिशय प्रतिभावान आणि फोकस्ड अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील फार उत्तम आहे. एकतर्फी विचार करणारी आणि आपलं काम गांभीर्याने करणारी ती अभिनेत्री आहे… प्रियांका कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत नाही… पण शाहरुख याच्यासोबत तिच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण प्रियांका कधीच याबद्दल बोलली नाही. तिला कोणीही याबद्दल काहीही लिहावे किंवा बोलावं असं वाटत नव्हतं.’

एवढंच नाही तर, 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत लारा दत्तासोबत प्रियांका देखील स्पर्धेत होती. तेव्हा लारा विजयी ठरली आणि प्रियांका फर्स्ट रनर – अप ठरली… तेव्हा देखील प्रियांका हिला टिकेचा सामना करावा लागला… असं देखील प्रल्हाद कक्कड म्हणाले. प्रियांका हिच्या सावळ्या रंगामुळे देखील तिला टोमणे मारण्यात आले…

प्रल्हाद कक्कड पुढे म्हणाले, ‘दोस्ताना सिनेमासाठी देखील प्रियांकाने प्रचंड मेहनत घेतली. फिटनेसवर देखील तिने विशेष लक्ष दिलं…जोखीम घेण्यास देखील तिने कधी मागेपुढे पाहिलं नाही… बॉलिवूडनंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये शुन्यापासून सुरुवात केली आणि ग्लोबल स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली…’ प्रियांका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.