AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परी, यश आणि नेहा पुन्हा एकत्र दिसणार… वाढदिवशी श्रेयस तळपदे याची मोठी घोषणा

'माझी तुझी रेशीमगाठी' मालिकेनंतर परी, यश आणि नेहा पुन्हा येणार चाहत्यांच्या भेटीला... अभिनेता श्रेयस तळपदे याने वाढदिवशी प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.

परी, यश आणि नेहा पुन्हा एकत्र दिसणार... वाढदिवशी श्रेयस तळपदे याची मोठी घोषणा
Shreyas Talpade
| Updated on: Jan 27, 2026 | 3:38 PM
Share

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अभिनेता श्रेयस तळपदे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेत प्रार्थना बेहेरे हिने परीच्या आईची भूमिका साकारली होती. बालकलाकार मायरा वायकुळ हिने छोट्या परीच्या भूमिकेला न्याय दिलेला. या भूमिकेनंतर मायरा हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. तर अभिनेता श्रेयस तळपदे याने यश हे पात्र साकारले होतं. तीघांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

मालिका गाजल्यानंतर सर्वत्र ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या चर्चा सुरु झाल्या. पण काही काळानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही परी, नेहा आणि यश यांना चाहते विसलेले नाहीत. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेलं हे त्रिकूट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीय आहे.

अभिनेता श्रेयस याने स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. श्रेयस याने वाढदिवशी आगामी सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. म्हणून आता सिनेमाच्या माध्यमातून तीच केमिस्ट्री आता पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदे प्रस्तूत अॅफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप बॅनरखाली हा सिनेमा तयार  करण्यात येणार आहे.

नारी सामर्थ्याची गाथा दाखवणाऱ्या सिनेमाचं नाव ‘मर्दिनी’ असं आहे… तर सिनेमात नारी सामर्थ्याची गाथा  दाखवण्यात येणार आहे.  सिनेमाचा पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत श्रेयस म्हणाला, ‘प्रत्येक महिषासुरासाठी… एक ‘मर्दिनी’ जन्म घेतेच… ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ पासून जवळच्या चित्रपटगृहात’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.

सिनेमाची कास्ट

मालिकेनंतर श्रेयस, प्रार्थना आणि मायरा यांना सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या तिघांसोबत सिनेमात  जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले  यांची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. तर दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?