AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सुंदर तरुणीला डेट करतोय Prateik Babbar; व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत प्रेम व्यक्त

Prateik Babbar याच्या आयुष्यात सुंदर तरुणीची एन्ट्री, गर्लफ्रेंडसोबत खास फोटो शेअर करत अभिनेत्याने व्यक्त केलं प्रेम... फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण...

'या' सुंदर तरुणीला डेट करतोय Prateik Babbar; व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत प्रेम व्यक्त
| Updated on: Feb 15, 2023 | 1:48 PM
Share

Prateik Babbar Love Life : सोशल मीडिया एक असं माध्याम आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करतो. फक्त सर्वसामान्यच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. आता अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) याने त्याच्या आयुष्यातील सुंदर गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या सर्वत्र प्रतीकच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत. प्रतिकने व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रतीक याने अभिनेत्री प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) हिच्यासोबत असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे.

प्रतीक याने प्रिया हिच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये दोघांनी एकमेकांसोबत पोज दिली आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघे त्यांच्या हातावर असलेला ‘पी आणि बी’ चा टॅटू दाखवत आहेत. खास फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये पी बी असं लिहित इन्फिनीटी असलेला इमोजी पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र प्रतीकच्या नव्या आयुष्याची चर्चा रंगत आहे.

View this post on Instagram

A post shared by prateik babbar (@_prat)

प्रतीक बब्बरचं पहिलं लग्न

प्रिया बनर्जी हिची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी प्रतीकचं लग्न झालं आहे. 2019 मध्ये प्रतीक याने बसपा पक्षाचे नेते पवन यांची मुलगी सान्या सागरशी लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिलं नातं अपयशी ठरल्यानंतरल प्रतीकच्या आयु्ष्यात एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून प्रिया हिची एन्ट्री झाली.

कोण आहे प्रिया बॅनर्जी?

प्रिया बॅनर्जी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियाने दाक्षिणात्य ‘किस’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत देखील ‘जज्बा’सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. प्रिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

प्रतीक याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करु शकला नाही. पण अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रतीक कायम फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच