AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जर तरची गोष्ट’साठी प्रिया बापटने गायलं गाणं; पहा व्हिडीओ

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाने शंभरी गाठली आहे. यानिमित्ताने प्रियाने तिच्या आवाजात खास गाणं रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'जर तरची गोष्ट'साठी प्रिया बापटने गायलं गाणं; पहा व्हिडीओ
Priya BapatImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2024 | 11:41 AM
Share

‘जर तरची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या नाटकाच्या अनेक प्रयोगांच्या वेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतंय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणंही प्रदर्शित झालं आहे. अभिनेत्री प्रिया बापटच्या आवाजातील हे सुंदर गीत नात्यातील गुपित दर्शवणारं असून संगीतप्रेमींना हे गाणं आता सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सवर ऐकता येईल.

प्रिया बापट आणि उमेश कामत हे इंडस्ट्रीतील क्यूट कपलपैकी एक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. सुमारे एका दशकानंतर ही इच्छा ‘जर तरची गोष्ट’च्या निमित्ताने पूर्ण झाली. पाहता पाहता आता या नाटकाने यशाचं शिखर गाठलं आहे. सर्व वयोगटाला आवडेल असं हे कौटुंबिक नाटक असल्याने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्ग या नाटकाला लाभत आहे. हीच या नाटकाची जमेची बाजू ठरत आहे. यात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह आशुतोष गोखले, पल्लवी अजय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कथा, दिग्दर्शन, कलाकार हे सगळं उत्तम जुळून आल्यानेच ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केलं असून इरावती कर्णिक यांचं लेखन या नाटकाला लाभलं आहे. नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाबद्दल प्रिया बापट म्हणते, “खरंतर हे सांगताना खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा आम्ही गाठला आहे आणि इतर प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगही हाऊसफुल्ल होता. एकाच वेळी मनात अनेक भावना आहेत. आनंद आहे, भारावले आहे, जबाबदारी आहे. या गोष्टी शब्दांत मांडणे अशक्यच. परंतु एक आवर्जून सांगेन, हा पल्ला गाठणं रसिकप्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झालंय. तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू दे. या नाटकातील गाणंही प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे ही डबल ट्रीट आहे.”

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.