AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marath Death : तुला शेवटची व्हॉइस नोट पाठवली होती, ती ऐकलीस का ग ? प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्री भावूक

जेव्हा रॉयल ऑपेरा हाऊसमधल्या त्या प्रयोगाचा पडदा पडला तेव्हा चुकूनही वाटलं नव्हतं की ही तिची आणि माझी शेवटची भेट असेल. आयुष्य unpredictable आहे. आपल्याला काहीच कल्पना येऊ शकत नाही की पुढे काय वाढून ठेवलय..

Priya Marath Death : तुला शेवटची व्हॉइस नोट पाठवली होती, ती ऐकलीस का ग ? प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्री भावूक
Priya Marathe And Swheta Pendse Image Credit source: social media
| Updated on: Sep 02, 2025 | 10:22 AM
Share

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल्याचं वृत्त रविवारी सकाळी आलं आणिअनेकांना धक्काच बसला. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झंज देत होती. अखेर बराच काळ आजाराशी झगडल्यानंतर 31 ऑगस्ट रोजी तिचं निधन झालं. तिच्या अकस्मात निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार शोकाकुल झाले असून रविवारी तिला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कलाकार आले होते.

त्यानतंरही अनेक कलाकारांनी, तिच्यासह काम केलेल्या लोकांनी सोशल मीडियावरून पोस्ट लिहीत, तिचे फोटो टाकत तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री श्वेता पेंडसे हिनेही सोशल मीडियावरील तिच्या अधिकृत अकाऊंटवरू तितचा व प्रियाचा एक फोटो टाकत एक पोस्टही लिहीली आहे. यामध्ये तिने प्रियाची झालेली पहिली भेट, त्यांची मैत्री, प्रियाचा स्वभाव, तिने आजाराशी दिलेला झगडा, यावर सविस्तर लिहीलेलं असून तिच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

श्वेता हिची पोस्ट :

‘जयोस्तुते ‘ मालिकेच्या निमित्ताने तिची पहिल्यांदा भेट झाली. मला आठवतं मी कोठारे व्हिजनच्या ऑफिसमध्ये ऑडिशन देत होते आणि दार उघडून प्रिया Priya Marathe आत आली. अत्यंत सुंदर दिसत होती. टवटवीत.. तजेलदार चेहरा.. खूप सुंदर! मी एक क्षण सगळं विसरुन तिच्याकडे बघत राहिले. तिचा आत्मविश्वास.. तिचं बोलणं.. दिसणं.. वावरणं.. सगळंच आवडलं. नंतर जयोस्तुते मालिकेमध्ये आम्ही दोघींनी एकत्र काम केलं. खूप सुस्वभावी होती प्रिया. मी तेव्हा नुकतीच नागपूरहून मुंबईला आले होते. फार कामही केलं नव्हतं. मला या इंडस्ट्रीचा फारसा अनुभव नव्हता. पण प्रिय अनुभवी होती. तिच्याकडून खूप गोष्टी समजत गेल्या. या क्षेत्रात कसं वागावं, किती बोलावं, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, कशासाठी भांडावं, कशासाठी हट्ट करावा, कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या.. अशा खूप गोष्टी तिने मला तिच्या सहवासाने शिकवल्या. माझं स्वतःचं make up चं pouch असावं he तिनेच मला सांगितलं. प्रिया रोज डायरी लिहायची. सेटवर वेळ मिळेल तेव्हा त्यात महत्त्वाच्या नोंदी करून ठेवायची. तिची एक शाल सेटवर आणायची. ती शाल घेऊन तिच्यापेक्षा जास्त वेळेला मीच बसलेली असायचे. आम्ही दोघी कायम एकाच मेकअपरूम मध्ये असायचो पण आमचं कधी भांडण …काहीही वाद झाल्याचं मला आठवत नाही. माझ्याच कितीतरी गोष्टींचा..बडबडीचा.. तिला त्रास होत असावा पण तिने कधी तक्रार केली नाही. खूप गोड होती प्रिया ! मला माहिती नव्हतं की आपला वाढदिवस असला की सेटवर सगळे मिळून केक कापत असतात. त्या दिवशी मला सकाळपासून बरेच फोन येत होते आणि मी थँक्यू थँक्यू म्हणत होते. शेवटी तिनेच विचारलं, अगं का थँक्यू म्हणते आहेस? काय झालं आहे? काही स्पेशल आहे का आज! मी म्हटलं अग माझा वाढदिवस आहे आणि प्रिया चक्क सेटवर गेली आणि सगळ्यांना ओरडून सांगितलं आज श्वेताचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला कळेचना काय करू… मग सेटवर केक आला. माझा वाढदिवस सेलिब्रेट झाला. मला खूप भरून आलं होतं. सतत आपल्यावर जळत असणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला असताना प्रिया सारखी गोड मुलगी आपल्या सहवासात असणं किती छान आहे. प्रियाशी संबंध इतके घट्ट झाले होते की तिच्या माहेरी तिच्या परोक्ष मी, माझी आई, मी माझा भाऊ जाऊन आलो होतो. तिच्या आईशी, वहिनीशी भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. छान फराळ झाला.

तिची प्रकृती खालावल्याचं कळलं आणि मन अस्वस्थ झालं..

एकाच मालिकेत काम केलं आम्ही. काही महिन्यांच्या सहवासात इतके छान स्नेहबंध जोडले गेले. त्यानंतर ‘ अ परफेक्ट मर्डर’ नाटक मला बाळंतपणासाठी सोडावं लागलं तेव्हा मी करत असलेली मीराची भूमिका प्रियानेच केली. खूप छान केली. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रयोग तिने केले आणि पुन्हा एकदा ‘ अ परफेक्ट मर्डर’ नाटकातच मी इन्स्पेक्टर घारगे म्हणून परत आल्यावर प्रियाचा थोडा तरी सहवास मिळाला. तिच्याबरोबर तो एक प्रयोग करण्याची संधी मला मिळाली. बस! तो एक ऑपेरा हाऊसचा प्रयोग! त्यानंतर प्रिया पुन्हा आजारी पडली. आमचे पुढचे प्रयोग कॅन्सल करावे लागले. तरी वाटत होतं की प्रिया बरी होईल. पण… त्या प्रयोगानंतर तिची आणि माझी भेट झालीच नाही. तिच्या प्रकृतीबद्दल समजत होतं. शंतनुशी बोलत होते. तिला भेटायची खूप इच्छा होती पण ती त्या मनस्थितीत नव्हती. कशी असेल? कित्येक वेळा विचारूनही प्रियाने भेटण्याची तयारी दाखवली नाही. मला कळत होतं तिचं मन. तिच्या मनस्थितीला आणि तिच्या मताला मान दिला. खूप वाटत असूनही मी भेटायला गेले नाही. मनोमन सतत वाटायचं.. प्रिया बरी व्हावी. पुन्हा आपण एकत्र काम करावं. तिची प्रकृती खालावल्याचं कळलं आणि मन अस्वस्थ झालं. असं वाटलं काहीतरी मिरॅकल व्हावं आणि प्रिया या सगळ्यातून बाहेर पडावी पण अखेर…

शेवटची एक व्हॉइस नोट पाठवली होती, ती ऐकलीस का ग ?

काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या तरी आपण करतो का? आज सगळी इंडस्ट्री हळहळते आहे… सगळ्यांना धक्का बसलाय.. कित्येकांना तर माहीतसुद्धा नव्हतं की प्रिया आजारी आहे.. तिने त्याचा गवगवा कधी केला नाही. ठीकच आहे ते.. पण आपण खरोखर एकमेकांची विचारपूस करतो का? प्रिया आज ज्या वेळी तिच्या शेवटच्या प्रवासाला निघाली असेल तेव्हा आम्ही प्रयोगाची तिसरी घंटा दिलेली असेल.. म्हणजे तिची तीही भेट होणार नाही. जीव हळहळतो आहे. असं आहे आपलं क्षेत्र !! माणूस निघून गेल्यावरही तुम्हाला भेटण्याची सोय असेलच असं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा खूप प्रेमाने भेटायला हवं ना.. सतत insecurity, jealousy.. आकस.. यात वावरत असतो आपण… सगळं बाजूला ठेवून खूप प्रेमाने, आदराने, आपुलकीने एकमेकांना भेटायला हवं.. मोकळेपणाने बोलायला हवं.. गोष्टी सांगायला हव्यात… मनातलं सगळं बाहेर बोलून टाकायला हवं.. जेव्हा रॉयल ऑपेरा हाऊसमधल्या त्या प्रयोगाचा पडदा पडला तेव्हा चुकूनही वाटलं नव्हतं की ही तिची आणि माझी शेवटची भेट असेल. आयुष्य unpredictable आहे. आपल्याला काहीच कल्पना येऊ शकत नाही की पुढे काय वाढून ठेवलय.. आला क्षण कोणाबद्दल कोणतही किल्मिश न ठेवता खूप प्रेमाने जगायला हवा… भरभरून जगायला हवा..!

प्रिया, मला तुझी खुप आठवण येईल. नेहमीच! खूप छान भूमिका तुझ्या वाट्याला आल्या असत्या. तू एक अत्यंत गुणी अभिनेत्री होतीस. त्याहीपेक्षा एक खूप प्रेमळ आणि उत्तम माणूस होतीस. ही तर सुरुवात होती ग! काय बोलू? हे असं भूतकाळात लिहिताना किती वेदना होतायत. सकाळपासून मन सुन्न झालंय.. तुला शेवटची एक व्हॉइस नोट पाठवली होती.. परवा ओपेरा हाऊसला प्रयोग असताना तुझी आठवण आली तेव्हा… ती तरी ऐकली होतीस का ग??

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.