AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपट बघणारे वेडे आहेत का? ‘धुरंधर 2’बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक स्पष्टच म्हणाला..

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शिक प्रियदर्शनने 'धुरंधर 2'ला प्रोपेगेंडा म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. जनतेनं मोकळ्या मनाने चित्रपटाचा स्वीकार करणाऱ्याला प्रोपेगेंडा म्हणत नाहीत, असं ते थेट म्हणाले.

चित्रपट बघणारे वेडे आहेत का? 'धुरंधर 2'बद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक स्पष्टच म्हणाला..
गौरव गेरा, रणवीर सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2026 | 9:46 AM
Share

रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा बॉलिवूडमधील सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरतोय. परंतु दुसरीकडे या चित्रपटाच्या कथानकावरून अद्याप वाद सुरूत आहे. एकीकडे गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 1000 कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट प्रचारकी (प्रोपेगेंडा) आहे की नाही, यावरून वादविवाद सुरू आहे. या वादात आता प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शननेही उडी घेतली आहे. ‘धुरंधर 2’च्या त्सुनामीदरम्यान प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तरीही त्यांनी आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’चं समर्थन केलं आहे.

‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रोपेगेंडा असल्याचा विचार त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. याविषयी ते म्हणाले, “हा चित्रपट फक्त जनतेसमोर सत्य मांडण्याचं काम करत आहे. जेव्हा संपूर्ण देशाने हा चित्रपट स्वीकारला आहे, तेव्हा काही लोकांच्या मताने काय फरक पडतो? भारताने हा चित्रपट पाहिला आहे आणि तो स्वीकारलाही आहे. यापेक्षा मोठा हिट चित्रपटच नाही. ज्या लोकांना तो पाहिला आहे, ते वेडे आहेत असं तुम्हाला वाटतं का?”

लोकांनी आपली मतं स्वत:पुरतीच मर्यादित ठेवावीत, त्यावरून वाद घालू नये, असा सल्ला त्यांनी ट्रोलर्सना दिला आहे. आदित्य धरला या चित्रपटाद्वारे जे साध्य करायचं होतं, ते त्याने केलं आहे. भारतातील बहुसंख्य लोकांनी हा चित्रपट स्वीकारला आहे आणि याचाचा अर्थ हा एक चांगला चित्रपट आहे, असं मत प्रियदर्शन यांनी मांडलं आहे.

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’चा दिग्दर्शिक आदित्य धर याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला प्रियदर्शनसोबत काम केलं होतं. त्याने प्रियदर्शनच्या ‘आक्रोश’ आणि ‘तेज’ या चित्रपटांसाठी संवाद लिहिले होते. याविषयी तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही मुलं आणि तुम्ही शिकवलेली माणसं आयुष्यात मोठं यश मिळवतात, तेव्हा सर्वांत जास्त आनंद होतो. त्यामुळे आदित्यने जे यश मिळवलं आहे, ते ऐकून मला खूप आनंद झाला आहे.”

‘धुरंधर 2’ने जगभरात 1350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतेय. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाने ‘बाहुबली 2’चा नऊ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

Follow Us
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.