AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्रा – निक जोनस यांच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा; कसं झालं सेलिब्रेशन?

प्रियांका चोप्रा - निक जोनस यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस; निक जोनस याने सांगितलं कसा साजरा झाला मालती मेरी हिचा जन्मदिवस

प्रियांका चोप्रा - निक जोनस यांच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा; कसं झालं सेलिब्रेशन?
प्रियांका चोप्रा - निक जोनस यांच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा; कसं झालं सेलिब्रेशन?
| Updated on: Jan 14, 2023 | 2:03 PM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केल्यानंतर प्रियांकाने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला आणि परदेशातही मानाचा तुरा रोवला. त्यानंतर प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर प्रियंका परदेशात राहते. कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारी प्रियांना गेल्या वर्षी सेरोगसीच्या माध्यमातून गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीच्या मुलीचं नाव मालती मेरी आहे.

नुकताच प्रियांका आणि निक यांनी लेकीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याच दरम्यान, निकने लेकीच्या वाढदिवसाबद्दल सांगितलं. नुकताच निक एका शोमध्ये पोहोचला होता. तेव्हा त्याला मालती मेरी हिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं झालं याबद्दल सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Jerry x Mimi (@jerryxmimi)

निक जोनस म्हणाला, ‘आमच्या मुलीच्या आयुष्याती काही भाग अत्यंत अडचणींचा होता. या वीकेंडला मालती मेरी एक वर्षांची झाली आहे. म्हणून तिचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा केला. ती प्रचंड क्यूट आणि बेस्ट आहे.’ असं देखील निक जोनस म्हणाला. सध्या सर्वत्र निक आणि प्रियांका यांच्या लेकीच्या वाढदिवसाची चर्चा रंगत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका कायम लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण अद्याप तिने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यामातून आई झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. तेव्हा चाहत्यांनी तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला.

लोकीचा जन्म झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रियांका म्हणाली, ‘सरोगसीद्वारे आम्ही मुलीचं स्वागत केलं आहे हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.’ प्रियांकाची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. आता प्रियांका आणि निक यांची मुलगी मालती मेरी एक वर्षांची झाली आहे.

Follow Us
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच