
Happy Birthday Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण यशाचं शिखर गाठण्यासाठी प्रियांकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता. अभिनेत्रीच्या आईने ‘दोस्ताना’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं आहे. प्रचंड ताप असल्यामुळे प्रियांका ‘दोस्ताना’ सिनेमाच्या सेटवर जाऊ शकली नव्हती. तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी अभिनेत्रीला टोमणा मारला होता. ज्यावर अभिनेत्रीच्या आईने दिग्दर्शकाला चांगलंच सुनावलं होतं.
मधू चोप्रा म्हणाल्या, ‘आज मी ज्या तरुणला ओळखते पूर्वी तो तसा नव्हता… प्रचंड भयानक माणूस होता. एके दिवशी प्रियांकाला ताप आला होती. तिने गोळी मागतली आणि मी तिला गोळी दिला. ती हट्ट करत होती मला कामाला जायचं आहे. पण एक तास झाला तरी तिचा ताप कमी होत नव्हता. तेव्हा तिला आरामाची पूर्ण गरज होती…’
पुढे मधू म्हणाल्या, ‘प्रियांकाने मला सांगितलं दिग्दर्शकाला फोन करायला…कारण शूटसाठी येत नाही असं सांगायला तिला भीती वाटत होती. त्यामुळे मी तरुणला फोन केला आणि सांगितलं, प्रियांकाला ताप आहे, त्यामुळे ती येणार नाही. यावर तरुण म्हणाली, ‘किती सोपे आहे…’
तरुण यांनी मारलेला टोमणा अभिनेत्रीच्या आईला खटकला आणि त्या म्हणाल्या, ‘जर तुला वाटत असेल की, तिला सेटवर मरण आलं पाहिजे तर मी तिला पाठवते. पण काहीही झालं तर त्यासाठी तू जबाबदार असशील…’ सांगायचं झालं तर, तेव्हा तरुण आणि मधू चांगले मित्र होते. आजही जेव्हा दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा याच गोष्टीवरून एकमेकांना चिडवत असतात.
प्रियांका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री पती निक जोनस आणि लेक मालतीमेरी यांच्यासोबत अमेरिकेत राहते. प्रियांका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील प्रियांका कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.