Priyanka Chopra: सरोगसीचा पर्याय का निवडला? अखेर प्रियांका चोप्राने मुलीविषयी सोडलं मौन

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने सरोगसीचा पर्याय का निवडला आणि मालतीच्या जन्मावेळी कोणत्या समस्या निर्माण झाल्या होत्या, याविषयी मोकळेपणे सांगितलं.

Priyanka Chopra: सरोगसीचा पर्याय का निवडला? अखेर प्रियांका चोप्राने मुलीविषयी सोडलं मौन
Priyanka ChopraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 10:23 AM

लॉस एंजिलिस: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी नुकताच मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. सरोगसीद्वारे जानेवारी 2022 मध्ये प्रियांकाला मुलगी झाली. या मुलीचं नाव तिने मालती मेरी असं ठेवलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने सरोगसीचा पर्याय का निवडला आणि मालतीच्या जन्मावेळी कोणत्या समस्या निर्माण झाल्या होत्या, याविषयी मोकळेपणे सांगितलं. “मालती जेव्हा NICU मध्ये होती, तेव्हा ती वाचणार की नाही अशी भीती माझ्या मनात होती”, असं प्रियांका म्हणाली.

“मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेटिंग रुममध्येच होतो. ती खूप लहान होती, अगदी माझ्या हातापेक्षाही लहान. डिलिव्हरीची जी तारीख देण्यात आली होती, त्याच्या तीन महिन्यांपूर्वीच मालतीचा जन्म झाला होता. त्यामुळे तिला काही दिवस रुग्णालयातच ठेवावं लागलं होतं. रुग्णालयातील प्रत्येक दिवशी आम्ही तिच्यासोबत होतो,” अशा शब्दांत प्रियांकाने अनुभव सांगितला.

हे सुद्धा वाचा

सरोगसीचा पर्याय निवडण्याविषयी ती पुढे म्हणाली, “मला वैद्यकीय समस्या होत्या. त्यामुळे हे पाऊल उचललं महत्त्वाचं होतं आणि सरोगसीचा पर्याय मी निवडू शकले यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आमची सरोगेट खूपच प्रेमळ आणि दयाळू होती. तिने आमच्या या मौल्यवान मुलीची सहा महिने खूप काळजी घेतली होती.”

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने सरोगसीचा पर्याय निवडल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकासुद्धा केली होती. या टीकाकारांनाही प्रियांकाने सडेतोड उत्तर दिलं. मी या निर्णयापर्यंत कशी पोहोचले याबद्दल बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही, असं ती म्हणाली. “तुम्ही मला ओळखत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून गेले, हे तुम्हाला मीहत नाही. मला माझी आणि माझ्या मुलीची मेडिकल हिस्ट्री सार्वजनिक करायची नाही म्हणून तुम्हीला काहीही बोलण्याचा अधिकार प्राप्त होत नाही”, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना फटकारलं.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

नेटकरी जेव्हा तिच्या मुलीविषयी काही नकारात्मक बोलतात, तेव्हा त्याचं खूप वाईट वाटत असल्याचं ती म्हणाली. “किमान तिला तरी यात ओढू नका. डॉक्टर जेव्हा तिची नस शोधत होते, तेव्हा तिचे चिमुकले हात धरताना मला काय वाटलं, हे फक्त मलाच माहीत आहे. त्यामुळे ती कोणाच्याच गॉसिपचा विषय असू शकत नाही”, असं प्रियांका म्हणाली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.