एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?

| Updated on: Apr 27, 2024 | 3:01 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गेल्या काही वर्षांत फिल्म इंडस्ट्रीत अनेकदा नकार पचवल्याचं तिने म्हटलंय. मात्र एकदा हा नकार एकाच्या गर्लफ्रेंडमुळे सहन करावा लागल्याचा खुलासा तिने केला.

एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?
प्रियांका चोप्रा
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वत:च्या अभिनयकौशल्याच्या जोरावर हॉलिवूडमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रियांकाने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र इथे काम करताना तिला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका अशा अनुभवांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “चित्रपटात एकाच्या गर्लफ्रेंडला भूमिका देण्यासाठी मला संधीला मुकावं लागलं”, असा खुलासा तिने केला. ‘रिड द रुम’ या पॉडकास्टमध्ये प्रियांका बोलत होती. अशा नकारांचा सामना करणं सोपं नसल्याचंही तिने म्हटलंय.

“हे कठीण असतं. विशेषकरून अशा नोकरीत, जिथे तुमच्या कामाला मंजुरी मिळणं खूप गरजेचं असतं. तुमचा चित्रपट पाहण्यासाठी किती लोक येतात किंवा तुमचा दिग्दर्शक तुमच्या अभिनयाबद्दल काय विचार करतो किंवा तुमचा कास्टिंग एजंट काय विचार करतो, या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. हे सर्व व्यक्तिनिष्ठ असतं”, असं प्रियांका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

याविषयी तिने पुढे सांगितलं, “फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी असंख्य नकार पचवले आहेत, तेसुद्धा असंख्य कारणांसाठी. मग त्या भूमिकेसाठी मी योग्य नसेन किंवा पक्षपात असेल किंवा मग एखाद्याच्या गर्लफ्रेंडला संधी द्यायची असेल. अशा अनेक कारणांसाठी मी नकार पचवला आहे. या सर्व गोष्टींतून मी कधीच बाहेर पडले. पण हे खरंय. आपण सर्वजण असं म्हणू शकतो की मी त्यापेक्षा चांगली आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे. पण हे सर्व खरं नसतं. तुम्हाला तो नकार जाणवला पाहिजे. हे एखादं शोक व्यक्त करण्यासारखं असतं. तो शोक व्यक्त करणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे. त्यातून मी कालांतराने पुढे निघून जाईन. ती गोष्ट बाजूला सारून पुढे जाईन. खूप वर्षांपूर्वी मी अशा नकारांच्या बाबतीत स्वत:चं समाधान करून पुढे निघून आले.”

याआधी सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने खुलासा केला होता की बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत काम करायला कोणीच तयार नव्हतं. “सुरुवातीची काही वर्षे खूप कठीण होती. कारण मी कोणावरच विश्वास केला नव्हता. कोणता चित्रपट करायला, कोणता नाही. एक काळ असा होता, जेव्हा माझ्या कोणत्याच चित्रपटाचं काम सुरू होत नव्हतं. मी पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत होते”, असं ती म्हणाली होती. गेल्या वर्षीही एका मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूडवर टीका केली होती. इंडस्ट्रीत मला एका कोपऱ्यात ढकललं गेलो होतं, असं तिने सांगितलं होतं.