अंगावर फक्त एकच साडी… ‘त्या’ दहा दिवसाच्या आठवणीने प्रियंका चोप्रा हिची बहीण शहारली
बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रियांका चोप्रा सध्या बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

मुंबई : प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस आणि मुलगी मेरी मालती यांच्यासोबत विदेशात राहते. काही दिवसांपूर्वीच तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली. यावेळी तिने काही खास फोटो शेअर करत मुंबई मेरी जान असे लिहिले. प्रियांका चोप्रा ही विदेशात असली तरीही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. कायमच ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. प्रियांका चोप्रा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
प्रियांका चोप्रा हिची बहीण मीरा चोप्रा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होती. तिने एक मोठा ब्रेक घेतल्याचे बघायला मिळाले. आता परत एकदा मीरा चोप्रा ही पुनरागमन करताना दिसत आहे. मीरा चोप्रा ही संदीप सिंह याच्या चित्रपटात दिसणार आहे. ‘सफेद’ हे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये मीरा चोप्रा ही एका विधवा महिलेचे पात्र साकार करत आहे.
नुकताच मीरा चोप्रा हिने सफेद चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा तिचा अनुभव हा शेअर केलाय. मीरा चोप्रा ही म्हणाली की, मला या चित्रपटासाठी पैसे दिले नाहीत. फक्त पैसेच नाही तर मला मेकअप देखील देण्यात आला नाही. साधा हेअर स्टायलिस्ट देखील नव्हता. चित्रपटाची शूटिंग तब्बल दहा दिवस सुरू होती. पहिल्या दिवशी फक्त एक साडी देण्यात आली.
पहिल्या दिवशी दिलेली साडी ही दहा दिवस घालावी लागली. यावेळी मीरा चोप्रा हिचे हे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ नक्कीच आहे. सफेद चित्रपटाची शूटिंग ही बनारसमध्ये झालीये.
विशेष म्हणजे सफेद चित्रपटाच्या भूमिकेसाठी मीरा चोप्रा हिचे काैतुक देखील केले जात आहे. मीरा चोप्रा ही चित्रपटांपासून जरी काही दिवस दूर असली तरीही ती नेहमीच चर्चेत असते. मीरा चोप्रा हिचा आता सफेद हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. मीरा चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
