मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता फुटला, थेट शिवसेनेत प्रवेश, घडामोडींना वेग
ZP Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचा एक बडा नेता शिंदेच्या गळाला लागला आहे. कोल्हापूरमधील या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही काळापासून ढवळून निघाले आहे. आधी नगर पालिका आणि नगर परिषदेची निवडणूक पार पडली, त्यानंतर आता महानगर पालिकेचीही निवडणूक पार पडली असून आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळालं होतं. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचा एक बडा नेता शिंदेच्या गळाला लागला आहे. कोल्हापूरमधील या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काँग्रेसला मोठा धक्का
कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
विश्वासराव आबाजी पाटील यांच्यासह शिरोली दुमला गावचे सरपंच सचिन पाटील, हनुमान दूध संघाचे अध्यक्ष बुद्धिराज शंकर पाटील महेकर, यशवंत सहकारी बँक कुडित्रेचे संचालक नंदकुमार अण्णासाहेब पाटील, अनिल सोलापुरे, राहुल पाटील, एस.के.पाटील, माधव पाटील, सुनील पाटील आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
📍 मुंबई |#कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी… pic.twitter.com/l2Zo2GBOf1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 17, 2026
अजित पवारांनाही मोठा धक्का
इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक काकाशेठ शेटे- पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार, माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, लाखेवाडी गावचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंपूर गावचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, सामाजिक कार्यकर्ते उमेश क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते समीर देशमुख, रासपचे इंदापूर शहराध्यक्ष हुसेन मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
