IND U19 vs BAN U19: वैभव सूर्यवंशी आऊट की नॉट आऊट! आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसी अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला नमवलं होतं. आता दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. पण या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या विकेटवरून वाद झाला.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसर्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भाताने 48.4 षटकात सर्व गडी गमवून 238 धावा केल्या आणि विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यातील षटकं कमी करण्यात आली. 29 षटकात 165 धावांचं टार्गेट दिलं गेलं. तसं पाहिलं तर हा सामना बांगलादेशच्या पारड्यात झुकलेला होता. पण भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशला 146 धावांवर रोखलं. यासह भारताने या स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 67 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार मारत 72 धावांची खेळी केली. पण इकबाल होसेन इमॉनच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात अल फहादच्या हाती झेल देत बाद झाला. पण त्याच्या विकेटवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
पंचांनी नो बॉल तपासला तेव्हा गोलंदाजी करताना पाय रेषेच्या पुढे होता. तरीही तिसऱ्या पंचांनी वैभव सूर्यवंशीला बाद दिले.आयसीसीच्या नियमांनुसार, फक्त गोलंदाजाचा पहिल्यांदा पाऊल कुठे पडलं ते पाहीलं जातं? तथापि, इमॉन त्याच्या पहिलं पाऊल पडलं तेव्हा बरोबर होता. ज्यामुळे सूर्यवंशीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यामुळे सोशल मीडियावरील त्याच्या विकेटबाबतच्या चर्चेला काही अर्थ नाही. तिसऱ्या पंचांनी नियमाप्रमाणे त्याला बाद दिलं. त्यामुळे याबाबत वाद घालण्यात तसा काही अर्थ नाही. ज्यांना आयसीसीचे नियम माहिती आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Vaibhav Suryavanshi dismissed in 72 runs in 65 balls against Bangladesh, U19 WC.
– A good knock in pressure sitution pic.twitter.com/YZqtXgmOs7
— CricPal (@AnupPalAgt) January 17, 2026
A Vaibhav Suryavanshi masterclass in the U19 World Cup. 🇮🇳 pic.twitter.com/JvgGnaD0lp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2026
दरम्यान, वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आपलं वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकलं. तसेच विक्रमाची नोंदही केली. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने फक्त 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हे वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. तसेच अर्धशतक करणारा सर्वात युवा फलंदाजही ठरला आहे. त्याने 14 वर्षे आणि 296 दिवासांचा असताना अर्धशतक ठोकलं आहे. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानच्या शाहिदुल्लाह कमालच्या नावावर होता. तेव्हा त्याचं वय हे 15 वर्षे आणि 19 दिवस होतं.
