New Brand : प्रियंकानं लाँच केला नवा हेअर केअर ब्रँड, इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर

प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे. (Priyanka launches new hair care brand, share post on Instagram)

  • Updated On - 1:31 pm, Sat, 30 January 21
New Brand : प्रियंकानं लाँच केला नवा हेअर केअर ब्रँड, इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर

मुंबई : अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे. प्रियंकानं स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या प्रॉडक्टविषयी माहिती देताना प्रियंकानं कॅप्शन दिलंय, ‘हे अनोमली आहे. मी तयार केलेला माझा पहिला ब्रँड, मी 18 महिन्यांपासून या प्रोडक्टवर आणि ब्रँडवर काम करत आहे.’

प्रियंका चोप्राच्या या ब्रँडची उत्पादनं 31 जानेवारीला अमेरिकेत लाँच होणार आहेत आणि या वर्षातच जागतिक बाजारपेठेत हे प्रोडक्ट्स उपलब्ध होतील. ‘गेल्या 18 महिन्यांपासून मी माझ्या पार्टनर्ससोबत या उत्पादनावर काम करत आहे. आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या उत्पादनाद्वारे आपल्या केसांना टीएलसी मिळेल ज्यामुळे तुमचे केस अधिक मजबूत आणि चांगले होतील. ‘ असं प्रियंका म्हणाली आहे.

प्रियंका पूर्वी ऐश्वर्यानं हेल्थकेअर कंपनी पॉसिबलमध्ये 5 कोटींची गुंतवणूक केली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालात त्यांनी ही माहिती दिली. या अहवालानुसार, कलारी कॅपिटल-समर्थित कंपनी, ज्याला पूर्वी ट्रुव्हट वेलनेस म्हणून ओळखले जात होतं, आता या पैशाचा उपयोग देशातील नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी होणार आहे.

तसेच आता प्रियंका अभिनयासोबतच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामनं एक यादी शेअर केली आहे ज्यामध्ये कोणते कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती रुपये घेतात. या टॉप 100 लोकांमध्ये फक्त 2 भारतीयांचा समावेश आहे. ते म्हणजे प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली.

मनोरंजन क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर या क्षेत्रातून प्रियंका चोप्रा ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिनं यात स्थान मिळवलंय. या यादीमध्ये प्रियंका 28व्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर तिचं 54 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 2.16 कोटी शुल्क आकारते.

Published On - 1:31 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI