AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 11 च्या लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप; शोमध्ये दोघांनी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा, सलमाननेही दिला होता इशारा

बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांची जोडी बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये तुफान चर्चेत होती. यामागचं कारण म्हणजे या शोमध्ये दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. इतकंच नव्हे तर खुद्द सलमान खानने दोघांना इशारा दिला होता.

Bigg Boss 11 च्या लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप; शोमध्ये दोघांनी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा, सलमाननेही दिला होता इशारा
Puneet Sharma and Bandagi KalraImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 23, 2023 | 3:16 PM
Share

मुंबई | 23 जुलै 2023 : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये अनेकदा जोड्या बनतात आणि बिघडतात. या शोमध्ये आल्यानंतर काही स्पर्धकांना आयुष्यभरासाठी जोडीदार भेटतो तर काहींचं नातं शो संपल्यानंतर संपुष्टात येतं. याच यादीत आता बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांचा समावेश झाला आहे. हे दोघं बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या सिझनमध्ये दोघांची जोडी फार चर्चेत आली होती. शोमध्ये असताना आणि शो संपल्यानंतरही बरीच वर्षे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अखेर आता दोघांनी ब्रेकअप जाहीर केलं. बंदगीने इन्स्टाग्रामवर याविषयीची माहिती दिली.

बंदगीने या पोस्टमध्ये लिहिलं, ‘हॅलो मित्रमैत्रिणींनो.. पुनीश आणि माझे मार्ग आता वेगळे झाले आहेत. हा निर्णय आम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीने घेतला आहे. आम्ही दोघांनी एकत्र जो वेळ घालवला, तो कायम आमच्या आठवणींमध्ये जपून ठेवू. यापुढेही आम्ही कायम एकमेकांना पाठिंबा देऊ. मी चाहत्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा आणि यावरून काही वेगळ्या चर्चा करू नयेत.’ बंदगीच्या या पोस्टने दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी कमेंट करत दोघांच्या ब्रेकअपचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांची जोडी बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये तुफान चर्चेत होती. यामागचं कारण म्हणजे या शोमध्ये दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. इतकंच नव्हे तर खुद्द सलमान खानने दोघांना इशारा दिला होता. तरी त्यालाही दुर्लक्ष करत दोघं बिग बॉसच्या घरात अनेकदा इंटिमेट होताना दिसले. कधी एकमेकांना किस करणं तर कधी रात्री उशिरा हळूच बाथरुममध्ये जाणं यांमुळे ही जोडी खूप चर्चेत आली होती. या सिझनच्या 43 व्या एपिसोडमध्ये तर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मध्यरात्री दीड वाजता दोघं एकत्र बाथरूममध्ये गेले आणि अर्ध्या तासाने बाहेर आले होते. त्यानंतर बंदगीने मर्यादा ओलांडल्याबद्दल पश्चात्तापसुद्धा व्यक्त केला होता.

बिग बॉसच्या या सिझननंतरही बंदगी आणि पुनीश एकत्र होते. शो संपल्यानंतर अनेकांची नातीही संपतात. मात्र बिग बॉसच्या घराबाहेरही दोघं एकमेकांना डेट करत राहिले. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता दोघांनी ब्रेकअप केलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.