AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंहगडाच्या पायथ्याशी नाना पाटेकरांनी का फार्महाऊस बांधलं? शोकसभेत पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण

नाना पाटेकरांनी स्वतःच्या अंत्यविधीची जागा आधीच ठरवली होती. पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितला भावुक करणारा किस्सा. त्यासोबतच नानांनी सिंहगडाच्या पायथ्याशी फार्महाऊस का बांधले? याचेही सांगितले कारण.

सिंहगडाच्या पायथ्याशी नाना पाटेकरांनी का फार्महाऊस बांधलं? शोकसभेत पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 15, 2026 | 4:05 PM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. नानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबईत आयोजित शोकसभेत दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्यासोबतच्या काही खास आठवणी सांगितल्या. यावेळी नानांनी सिंहगडाच्या पायथ्याशी फार्महाऊस का बांधले आणि स्वतःच्या अंत्यविधीबाबत काय सांगितले होते, याचा भावुक करणारा खुलासाही त्यांनी केला.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, त्यांनी नाना पाटेकर यांचा प्रवास अगदी रंगभूमीपासून पाहिला आहे. नानांना अभिनयासोबतच स्केचिंगचीही आवड होती. सामाजिक कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले. काही दिवसांपूर्वी बेर्डे यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर दोघांचे फोनवर जवळपास पाऊण तास बोलणे झाले होते. त्यानंतर ते नानांच्या शेतावर त्यांना भेटायला गेले होते.

नानांच्या फार्महाऊसवर एक मोठे तळे, विहीर, बैलगाड्या, गायी आणि वाडा असल्याचे बेर्डे यांनी सांगितले. तिथे सुमारे 350 कोंबड्याही होत्या. विशेष म्हणजे, नाना त्यांना सांभाळत होते; मात्र त्यांना कधीही हात लावला नव्हता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

‘माझा अंत्यविधी इथेच करा’, नानांचे ते शब्द!

फार्महाऊसवर फिरत असताना नानांनी एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवून तिथे आपला अंत्यविधी करण्यास सांगितले असल्याचे बेर्डे यांनी सांगितले. आजूबाजूची झाडेही त्यासाठी वापरण्याबाबत नानांनी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नानांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीची जागा कुठे असेल, याची चौकशी करण्याची गरजच पडली नाही, असे बेर्डे भावुक होत म्हणाले.

नानांना आयुष्याचा शेवट रुग्णालयात किंवा दीर्घ आजारपणात घालवायचा नव्हता. आपल्या शेवटाबाबतही त्यांनी आधीच विचार केला होता, असे बेर्डे यांनी नमूद केले.

सिंहगडाच्या पायथ्याशी फार्महाऊस का बांधले?

नानांचे फार्महाऊस पुण्यापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर सिंहगडाच्या पायथ्याशी आहे. एवढ्या आतल्या भागात फार्महाऊस का बांधले असे बेर्डे यांनी नानांना विचारले होते. त्यावर सिंहगडाच्या परिसराशी असलेले भावनिक नाते सांगताना नानांनी, याच भागातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकेकाळी गेले असतील असे म्हटले होते.

फार्महाऊसच्या बाहेर पडल्यावर सिंहगडाचे दर्शन होत असल्याचा नानांना विशेष अभिमान होता असेही बेर्डे यांनी सांगितले. नानांनी आपल्या आयुष्याचा आणि शेवटाचाही विचार अतिशय शांतपणे केला होता या आठवणी सांगताना पुरुषोत्तम बेर्डे भावुक झाले.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?