AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधींची कमाई करूनही ‘धुरंधर 2’मधल्या आर. माधवनला मागावी लागली जाहीर माफी; असं घडलं तरी काय?

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनच्या एका दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे, यावेळी त्याने जनतेची माफीसुद्धा मागितली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या..

कोट्यवधींची कमाई करूनही 'धुरंधर 2'मधल्या आर. माधवनला मागावी लागली जाहीर माफी; असं घडलं तरी काय?
आर. माधवनImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 2:38 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटातील अभिनेता आर. माधवनच्या एका दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. चित्रपटात माधवनने साकारलेला अजय सन्याल हा जेव्हा गुरबानीचा उल्लेख करतो, तेव्हा त्याच्या हातात सिगारेट दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. असं दाखवणं धार्मिक मर्यादेविरुद्ध असल्याचा आरोप शीख समुदायाने आणि नेत्यांनी केला आहे. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नेते गुरजोत सिंह कीर यांनी या दृश्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत माफीची मागणी केली होती. त्यावर आता आर. माधवनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला आर. माधवन?

धुरंधरच्या संपूर्ण परिवाराकडून मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. नुकतंच आम्हाला समजलंय की काही लोकांनी या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्या सीनमध्ये मी गुरु गोविंद सिंह यांच्या पवित्र दसम ग्रंथातील काही ओळी बोलताना मी सिगारेट ओढत होतो, असं म्हणत त्यांनी भावना दुखावल्याची तक्रार केली आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हे चुकीचं आहे, यात थोडा गैरसमज झाला आहे. या सीनच्या शूटिंगदरम्यान ती ओळ बोलण्यापूर्वी आदित्य धरने, जो अशा गोष्टींबद्दल माझ्यापेक्षा अधिक काळजी घेतो, त्याने मला सांगितलं होतं की, ती ओळ बोलण्यापूर्वीच तू सिगारेट विझवून टाक. तुझ्या तोंडून किंवा स्क्रीनवर कुठेही सिगारेटचा धूर दिसता कामा नये. सीनमध्ये सिगारेटसुद्धा दिसू नये. कारण आमच्यासाठी ते खूप पवित्र आहे,” असं त्याने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

या व्हिडीओत तो पुढे म्हणाला, “आदित्य धरने सांगितल्यानुसार मी माझ्या हातातली सिगारेट विझवली होती. जर तुम्ही सीन पाहिला तर तुम्हाला विश्वास बसेल की, माझ्या तोंडून किंवा स्क्रीनवर कुठेही सिगारेटचा धूर दिसत नाही. तो संपूर्ण सीन आणि फ्रेम संपेपर्यंत तुम्हाला सिगारेटचं अस्तित्वही दिसणार नाही. आम्हाला कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहीत. आम्ही शीख समुदायाचा खूप आदर करतो आणि कायम आम्ही त्यांच्यासोबत राहू. प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी स्वत: सुवर्णमंदिरात जातो, हे सर्वांना माहीत आहे.”

“मी पुन्हा एकदा सांगतो की, सीनच्या सुरुवातीच्या तुम्हाला माझ्या हातात सिगारेट दिसली असेल. माझी भूमिकाच तशी होती. पण जेव्हा सीन सुरू होतो आणि बाकी लोक बोलतात, तेव्हा मी सिगारेट विझवतो. मी त्या ओळी बोलण्याच्या खूप आधीपासूनच तुम्हाला त्यात कुठलीही सिगारेट किंवा त्याचा धूर दिसत नाही. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो,” असं माधवन म्हणाला.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...