Video: ‘रानबाजार’मधील दमदार अभिनयानंतर आता माधुरी पवारच्या ठसकेबाज लावणीची चर्चा

Video: 'रानबाजार'मधील दमदार अभिनयानंतर आता माधुरी पवारच्या ठसकेबाज लावणीची चर्चा
Madhuri Pawar
Image Credit source: Youtube

ठसकेदार आणि दिमाखदार अशी ही लावणी नव्या ढंगातली आहे. धमाल शब्द आणि उडती चाल असलेलं हे गाणं लगेचंच ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 26, 2022 | 9:12 AM

सध्या जोरदार चर्चेत असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ‘आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी’ असे धमाल शब्द असलेल्या ‘लाल मोठी गाडी’ (Laal Mothi Gaadi) ह्या सप्तसूर म्युझिकच्या नव्या म्युझिक व्हिडिओतून (Music Video) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा व्हिडीओ नुकताच सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे.माधुरी पवारनं या धमाल गाण्यावर ठेका धरला आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. या गाण्याचं लेखन माधवी देवळणकर यांनी केलं आहे, तर अमेय मुळे यांचं संगीत असलेलं हे गाणं लरिसा अल्मेडा या नव्या गायिकेनं गायलं आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

ठसकेदार आणि दिमाखदार अशी ही लावणी नव्या ढंगातली आहे. धमाल शब्द आणि उडती चाल असलेलं हे गाणं लगेचंच ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं. सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत कोळीगीत, प्रेमगीत असे वेगवेगळे म्युझिक व्हिडिओ सादर केले आहेत. त्यात आता लाल मोठी गाडी या लावणी म्युझिक व्हिडिओची भर पडत आहे.

पहा व्हिडीओ

अभिनेत्री माधुरी पवार सध्या तिच्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळेही चर्चेत आहे. राजकारणातील एक महत्वाकांशी आणि करारी स्त्रीची भूमिका तिने यामध्ये चोख साकारली आहे. अलीकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लुक बद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणं हे खरंच वाखाण्याजोगं आहे. वडीलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी. जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनंतर तिने स्वतःचे केलेले मुंडन अन् त्याच बाल्ड लुकमध्ये तिने पुढे सुरू ठेवलेला राजकीय प्रवास हा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढविणारा आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें