राधिका मर्चंट की श्लोका मेहता, कोण सर्वाधिक श्रीमंत? अंबानींच्या दोन्ही सुनांची संपत्ती किती?
अंबानी कुटुंबातील दोन्ही सुना कायम चर्चेत असतात. विविध कार्यक्रमांमध्ये त्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात. राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे तुम्हाला माहित आहे का? या दोघींपैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे, ते जाणून घ्या..

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. आकाश अंबानीने श्लोका मेहताशी लग्नगाठ बांधली आहे. तर अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी लग्न केलं. अंबानी कुटुंबातील या दोन्ही सुना नेहमी चर्चेत असतात. या दोघी त्यांच्या क्षेत्रात बऱ्याच यशस्वी आहेत. परंतु अंबानी कुटुंबातील दोन्ही सुनांपैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे, कोणाकडे सर्वाधिक संपत्ती आहे, हे तुम्हाला माहितीये का?
आकाश अंबानीने 2019 मध्ये रसेल मेहता आणि मोना मेहता यांची कन्या श्लोका मेहताशी लग्न केलं. या दोघांना पृथ्वी हा मुलगा तर वेदा ही मुलगी आहे. श्लोकाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून अँथ्रोपोलॉजीमध्ये पदवी संपादन केली. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.
श्लोकाने बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून इंटरनॅशनल बॅकलॉरिएटमध्ये डिप्लोमा मिळवला आहे. सध्या ती ब्ल्यू इंडियामध्ये संचालक म्हणून काम करतेय. श्लोकाच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्या, ‘बॉलीवूड शादी डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, ती 149 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी लग्न केलं. राधिका ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे. राधिका तिच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वासाठी ओळखली जाते. अंबानी कुटुंबाची छोटी सूनसुद्धा यशस्वी आहे. मुंबईतल्या कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूलमधून राधिकाने शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून इंटरनॅशनल बॅकलॉरिएटमध्ये डिप्लोमा प्राप्त केला.
राधिकाने न्यूयॉर्क युनिव्हिर्सिटीमधून राजकीय आणि अर्थशास्त्रात पदवी संपादित केली. सध्या ती एनकोअर हेल्थकेअरमध्ये संचालकपदी कार्यरत आहे. राधिकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, ती तिच्या जाऊबाईंपेक्षा बरीच मागे आहे. ‘बॉलिवूड शादी डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, राधिकाची एकूण संपत्ती 10 कोटी रुपयांच्या घरात आहे. राधिकाचे वडील वीरेन मर्चंट हे प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट आहेत. ‘जीक्यू’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास 755 कोटी रुपये इतकी आहे. राधिकाने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं असून तिला नृत्याची खूप आवड आहे.
