Rahul Roy | राहुल रॉय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ‘स्ट्रोक’ चित्रपटातून करणार पुनरागमन!

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय (Actor Rahul Roy) यांना कारगिलमध्ये शूटिंग सुरु असताना मेंदूघाताचा (brain stroke) झटका आल्याची माहिती समोर आली होती.

Rahul Roy | राहुल रॉय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 'स्ट्रोक' चित्रपटातून करणार पुनरागमन!
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 12:32 PM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय (Actor Rahul Roy) यांना कारगिलमध्ये शूटिंग सुरु असताना मेंदूघाताचा (brain stroke) झटका आल्याची माहिती समोर आली होती. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल ( LAC – Live the Battle) या चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याची बहीण त्यांना घरी घेऊन गेली आहे. मात्र, त्यांची स्पीच थेरपी सुरूच राहणार आहे. राहुल रॉय यांच्या आगामी ‘सायोनी’ चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे. सायोनी या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन यांनी केले आहे.(Rahul Roy to be discharged from hospital)

नितीन म्हणाले की, बाकी निर्माते राहुलसोबत काम करण्यास मागेपुढे पाहत आहेत. पण मी राहुलसोबत आणखी एका चित्रपटाची करणार आहे. स्ट्रोकनंतर राहुलचा हा पहिलाच चित्रपट असणार त्या चित्रपटाचे नाव ‘स्ट्रोक’ असेल आणि राहुल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हत्या आणि रहस्य गोष्टी यावर आधारित आहे. हा चित्रपट फेब्रुवारी 2021 मध्ये लाँच होईल.

राहुल रॉय यांनी चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर करुन आपल्या तब्येतीची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये राहुल हसताना दिसत होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक देखील या व्हिडिओत दिसत होते. ते राहुलच्या तब्येतीची माहिती देत होते. हा व्हिडिओ पोस्ट करत राहुल रॉय यांनी लिहले होते की, मी बरा आहे आणि लवकरच परत काम सुरू करेल, माझी तब्येत बरी व्हावी म्हणून तुम्ही सर्वांनी प्रार्थना केल्या बद्दल मी तुमचा आभारी आहे.

राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते. सध्या राहुल रॉय कारगिलमध्ये LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. यामध्ये ते एका मेजरची व्यक्तिरेखा साकारत आहेत. नितीन कुमार गुप्ता LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बसू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटामुळे राहुल रॉय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. ‘आशिकी’ चित्रपटानंतर राहुल रॉय यांनी तब्बल ४७ चित्रपट साईन केले. मात्र, त्यानंतर राहुल रॉय हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुरावले. मध्यंतरी ते छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचे विजेते ठरले होते. त्यानंतर ते पुन्हा लाईमलाईटपासून दूर गेले होते.

संबंधित बातम्या : 

Rahul Roy | राहुल रॉयच्या तब्येतीत सुधार, मात्र उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात, दिग्दर्शक मित्राकडून आर्थिक मदतीचे आवाहन!

(Rahul Roy to be discharged from hospital)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.