AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीच्या लग्नामुळे दुखावला, स्वतःला सिगारेटने चटके दिले…; कपूर घराण्यातील ‘त्या’ अभिनेत्याची चर्चा

बॉलिवूडच्या इतिहासातील अशी एक लव्हस्टोरी ज्याची चर्चा आजही केली जाते. असा एक अभिनेता ज्याचं एका अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे बरीच चर्चा रंगली होती. पण जेव्हा त्या अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्याशी लग्न केलं तेव्हा त्यांना एवढा त्रास झाला होता की त्या अभिनेत्याने स्वत:ला सिगारेटचे चटकेही दिले होते. मुख्य म्हणजे हा अभिनेता कपूर घराण्यातील असून त्याची आजही चर्चा होते.

अभिनेत्रीच्या लग्नामुळे दुखावला, स्वतःला सिगारेटने चटके दिले...; कपूर घराण्यातील 'त्या' अभिनेत्याची चर्चा
| Updated on: Mar 03, 2025 | 3:32 PM
Share

बॉलिवूडमध्ये  रील लाईफप्रमाणे रीअल लाईफच्याही अशा अनेक लव्ह स्टोरीज आहे ज्या कधीच पूर्ण होऊ शकल्या नाहीत. बॉलिवूडमधील अशीच एक लव्हस्टोरी ज्याची चर्चा आजही केली जाते पण ही प्रेमकहाणी मात्र पूर्ण होऊ शकली नाही. मुख्य म्हणजे हा अभिनेता कपूर घराण्यातील असून अनेक हीट चित्रपट या अभिनेत्याने दिले आहेत.

राज कपूर यांच्या एका अफेअरची चर्चा कायम होते

हा अभिनेता म्हणजे राज कपूर. एका अभिनेत्रीसोबतच्या अफेअरने सर्वात जास्त चर्चा रंगली होती. राज कपूर यांनी कधीही त्या अभिनेत्रीशी लग्न करण्याचा विचार केलाच नव्हता पण जेव्हा त्या अभिनेत्रीने एका वेगळ्याच अभिनेत्याशी लग्न केलं तेव्हा मात्र त्यांना हे अजिबात सहन झालं नाही. ते त्यांच्या मित्रांसमोर ढसाढसा रडले होते. असे म्हटले जाते की त्यांनी रागात सिगारेटने स्वतःला चटके द्यायलाही सुरुवात केली होती.

राज कपूर यांचे चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीही कायम चर्चेत राहिलं आहे. राज कपूर नेहमीच ‘ग्रेट शोमॅन’ राहिलेत. त्यांचे चित्रपट आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य वर्षानुवर्षे चर्चेत राहिले. विशेषतः त्याच्या नायिकांशी असलेले त्यांचे अफेअर्स. पण त्याचं नात जास्त चर्चेत राहिलं ते अभिनेत्री नर्गिससोबतचं. या दोघांच्या अफेअरने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं.

राज कपूर आणि नर्गिस यांनी कधीही त्यांचे नाते उघडपणे स्वीकारलं नाही.

मात्र राज कपूर आणि नर्गिस यांनी कधीही त्यांचे नाते उघडपणे स्वीकारलं नाही. परंतु त्यांचा मुलगा ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात सांगितलं आहे की, कृष्णा मल्होत्रा ​​यांच्याशी लग्न झालेलं असतानाही राज कपूर यांचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते. राज कपूर यांनी देखील एकदा एका मुलाखतीत नर्गिसचं नाव न घेता तिच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलले होते. राज कपूर आणि नर्गिस यांची पहिली भेट नर्गिस फक्त 16 वर्षांची असताना झाली. त्यावेळी राज कपूर विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती

राज कपूर यांनी दूरदर्शनच्या एका डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटलं होतं की, ‘ती खूप लहान होती. अगदी एखाद्या परी सारखी, किती उत्तम अभिनेत्री होती ती. चित्रपट माझ्यासाठी पूजासारखे होते, मी त्यांच्याशी पूर्णपणे जोडले गेलो होतो. त्याच्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनली. मी हे नक्की म्हणेन की नर्गिसने आरके स्टुडिओला खूप काही दिलं आहे”

“माझ्या पत्नीचा अर्थ माझ्या मुलांची आई असा आहे”

दरम्यान राज कपूर यांनी हे देखील कबूल केलं होतं की, त्यांनी कधीही नर्गिसशी लग्न करण्याचा विचार केला नव्हता, त्यामुळे त्यांची पत्नी कृष्णाला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. ते म्हणाले होते की, ‘सुरुवातीपासूनच मी एक रेषा आखली होती आणि हे अगदी खरं आहे की माझी पत्नी माझी नायिका नाही आणि माझी नायिका माझी पत्नी नाही. माझ्या पत्नीचा अर्थ माझ्या मुलांची आई असा आहे. तर, माझे घर दुसरीकडे कुठेतरी होते. कृष्णा माझ्या मुलांची आई होती. तर इथे माझी नायिका होती. माझ्या सर्जनशीलतेत योगदान दिल्याबद्दल तिने समाधान व्यक्त करायची. हेच तिचं समाधान होतं.

“माझ्या नायिकेला माझी पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला नाही”

राज कपूर पुढे म्हणाले होते की, ‘मी माझ्या पत्नीला माझी नायिका बनवण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा माझ्या नायिकेला माझी पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळेच संतुलन टिकून राहिलं. आम्ही वर्षानुवर्षे पूर्ण समर्पणाने काम करत राहिलो. कोणीही एकमेकांनी फसवलं नाही. माझ्या मुलांची आई माझी नायिका बनण्यासाठी नव्हतीच, म्हणून तिची फसवणूक केल्यासारखं मला वाटलं नाही. त्याचप्रमाणे, ती अभिनेत्री माझ्याकडे माझी नायिका बनण्यासाठी आली होती, माझ्या मुलांची आई म्हणून नाही.” असं म्हणत त्यांनी त्यांची भूमिका किती स्पष्ट होती हे सांगितलं.

नर्गिसचे राज कपूर यांच्यावर खूप प्रेम होते पण….

नर्गिसचे राज कपूर यांच्यावर खूप प्रेम होते, पण अखेर तिला जाणवले की राज कपूर कधीही कृष्णाला सोडणार नाहीत. एका रिपोर्टनुसार नर्गिसने 1958 मध्ये सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं ज्याला राज कपूरने विश्वासघात मानलं. ‘द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकात मधु जैन यांनी लिहिले आहे की, राज कपूर यांनी एकदा पत्रकार सुरेश कोहली यांना सांगितलं होतं की, जग म्हणतं की मी नर्गिसचा विश्वासघात केला. खरंतर, तिने मला फसवलं.” नर्गिसच्या लग्नामुळे राज कपूर किती दुःखी झाले होते हे पुस्तकात सांगितलं आहे. जेव्हा त्यांना कळले की नर्गिसने सुनील दत्तशी लग्न केले आहे, तेव्हा ते त्याच्या मित्रांसमोर आणि सहकाऱ्यांसमोर खूप रडले होते. राज कपूर हे सहन करू शकले नाहीत.

तर अशी ही बॉलिवूडची ब्लॅक अँड व्हाइट प्रेम कहाणी जी अपूर्णच राहिली होती. ज्याची आजही तेवढीच चर्चा होते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.