AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : बॉक्स ऑफीसवर ‘राजा शिवाजी’चा डंका कायम, घोडदौड सुरूच, 8 व्या दिवशीही बंपर कमाई

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात मोठे यश मिळवलं. मात्र, प्रदर्शनाच्या दिवसांमध्ये त्याच्या कमाईत थोडी घट झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी वीकेंडवर लागले आहे, जिथे हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.

Raja Shivaji : बॉक्स ऑफीसवर 'राजा शिवाजी'चा डंका कायम, घोडदौड सुरूच, 8 व्या दिवशीही बंपर कमाई
राजा शिवाजी चित्रपट
| Updated on: May 09, 2026 | 11:08 AM
Share

बॉलिवूड मधील विख्यात अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चे आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरू आहे. 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात 50 कोटींचा टप्पा ओलांडला असून, आठव्या दिवशीही त्याने कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात रितेश शिवाय अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख सलममान खान, संजय दत्त, विद्या बालन यांसह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच रितेश देशमुखच्या मुलांनाही यात छोटीशी भूमिका केली आहे.

1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीपेक्षा मराठी आवृत्तीला प्रेक्षकांकडून अधिक प्रेम मिळत आहे. सुरुवातीच्या तेजीनंतर चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, आता राजा शिवाजी चित्रपटाची घोडदौड पुन्हा सुरू झाली असून कमाईतही पुन्हा वाढ झाली. आठव्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं समजतं.

बॉक्स ऑफीसवर तूफान कमाई

‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. सॅकनिल्क या व्यापार वेबसाइटच्या अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी भारतात 3.20 कोटी कमाई केली आहे. यामध्ये मराठीतील 2.50 कोटी रुपये आणि हिंदीतील 70 लाखांच्या कमाईचा समावेश आहे.यामुळे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची आत्तापर्यंतची एकूण देशांतर्गत कमाई 55.85 कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 66.23 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने तब्बल 52.65 कोटी अशी तगडी कमाई केली.

पहिल्याच दिवशी मोठा गल्ला

‘राजा शिवाजी’ने पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई केली आणि आठवड्याच्या शेवटीही आपली दमदार घोडदौड या चित्रपटाने कायम ठेवली. चित्रपटाने शनिवारी 10.55 कोटी आणि रविवारी 12 कोटींची कमाई केली.

सुरुवातीच्या घसरणीनंतर, चित्रपटाने पुन्हा एकदा आपली पकड मिळवली. ‘राजा शिवाजी’ने सोमवारी बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी कायम ठेवत 5.60 कोटी कमावले. मात्र, मंगळवारी चित्रपटाची कमाई किंचित घटून 4.90 कोटी झाली.

तेव्हापासून चित्रपटाची कमाई स्थिर राहिली असून, बुधवारी 4.25 कोटी आणि गुरुवारी 4 कोटींची कमाई झाली आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी वीकेंडवर लागले आहे; चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रितेश देशमुखने या चित्रपटात केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर त्याचे सह-लेखनही केले आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर