AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेटवर कीटक चावल्यानंतर राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर, मेडिकल स्टेटमेंट डिलिट; नेमकी भानगड काय?

अक्षय कुमारने राजेश यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. 'माझा मित्र राजेशला कीटक चावल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचं ऐकून मला खूप काळजी वाटत आहे. मला आशा आहे की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. लवकर बरा हो मित्रा, आपण एकत्र खूप मजा केली आहे', असं त्याने म्हटलंय.

सेटवर कीटक चावल्यानंतर राजेश शर्मा यांची प्रकृती गंभीर, मेडिकल स्टेटमेंट डिलिट; नेमकी भानगड काय?
Rajesh SharmaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2026 | 10:38 AM
Share

‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये अभिनेते राजेश शर्मा यांना एका विषारी कीटकाने चावल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सुदिपा चॅटर्जीने सोशल मीडियावर याबाबतची माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. मात्र 24 तासांच्या आता ती पोस्ट काढून टाकण्यात आली. याप्रकरणी आता ऑल इंडिया सिने वर्क्स असोसिएशनने (AICWA) उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘फौजी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. या शूटिंगदरम्यान राजेश यांचा एका विषारी कीटकाने किंवा कोळ्याने चावा घेतला. शूटिंगदरम्यान सेटवर बऱ्याच लोकांची वर्दळ होती. त्यामुळे जेव्हा कीटकाने राजेश यांच्या पायाला चावा घेतला, तेव्हा नेमकं काय घडलं हे त्यांना कळलंसुद्धा नाही. म्हणून ते शूटिंग करत राहिले. नंतर जेव्हा ते कोलकाताला गेले, तेव्हा तिथे त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदिपाने याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, पण नंतर ती डिलिट केली.

चित्रपटाच्या टीमचं स्पष्टीकरण

दुसरीकडे ‘फौजी’ या चित्रपटाच्या टीमने या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुल्टी’ या दाक्षिणात्य चित्रपट पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, फौजीच्या टीमने सांगितलंय की, राजेश यांच्या बाबतीत अशा कोणत्याही घटनेबद्दल त्यांना माहिती नव्हती. हे वृत्त समोर येण्याच्या सुमारे आठवडाभर आधीच त्यांनी त्यांच्या भागाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. त्यानंतर ते घरी परतले होते. प्रॉडक्शन टीममधील कोणत्याही सदस्याला राजेश यांच्या बाबतीत कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीबद्दल कोणतीही औपचारिक माहिती मिळाली नव्हती. फौजी टीमने पुढे असंही सांगितलं की, हे वृत्त आल्यानंतर त्यांनी राजेश यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

राजेश यांचे वैयक्तिक सहाय्यक शुभाशीष पांडा यांनीसुद्धा वेगळी माहिती दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं होतं की, राजेश यांना मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून लवकरच ते डिस्चार्ज होणार आहेत. त्यामुळे राजेश यांना नेमकं काय झालं आहे, याबद्दल प्रचंड संभ्रम चाहत्यांमध्ये आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा