‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 9’च्या फिनालेमध्ये राजू श्रीवास्तवच्या मुलाचीच चर्चा; टॅलेंट पाहून भारावले प्रेक्षक

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 8:53 AM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर 2022 मध्ये निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका झाला.

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 9'च्या फिनालेमध्ये राजू श्रीवास्तवच्या मुलाचीच चर्चा; टॅलेंट पाहून भारावले प्रेक्षक
Aayushman Srivastava
Image Credit source: Instagram

मुंबई: दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडी विश्वात आपली स्वत:ची जबरदस्त ओळख बनवली. आज ते या जगात नाहीत. मात्र त्यांच्या प्रतिभेचं कौतुक आजही चाहत्यांकडून होतं. आता राजू श्रीवास्तव यांचा मुलगासुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊस टाकत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुषमान हा कॉमेडी विश्वात नाही तर संगीत विश्वात दमदार कामगिरी करतोय. आयुषमान हा उत्तम सितारवादक आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 9’च्या ग्रँड फिनालेमध्ये आयुषमानने त्याच्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क केलं.

आयुषमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो सितारवादन करताना दिसत आहे. आयुषमान हळूहळू म्युझिक म्युझिक इंडस्ट्रीकडे वाटचाल करतोय. त्याची प्रतिभा पाहून तोसुद्धा वडिलांप्रमाणेच स्टार होणार अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

आयुषमान हा प्रोफेशनल सितारवादक आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्सच्या नवव्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये एका स्पर्धकासाठी आयुषमानने सितारवादन केलं. मंचावर आयुषमानची प्रतिभा पाहून अनेकांना त्याच्या वडिलांची आठवण झाली.

आयुषमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोमधील खास क्षणांचा एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. त्याचसोबत त्याने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर 2022 मध्ये निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. त्यानंतर रुग्णालयात बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI