AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंतची प्रकृती सर्जरीनंतर खालावली, पहिल्या पतीचा धक्कादायक दावा

Rakhi Sawant : सर्जरी झाल्यानंतर देखील खालावली राखी सावंतची प्रकृती, सर्जरी करून काढण्यात आलेला ट्यूमर तपासणीसाठी पाठवण्यात आलाय..., चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता, रितेश याने दिली मोठी माहिती

राखी सावंतची प्रकृती सर्जरीनंतर खालावली, पहिल्या पतीचा धक्कादायक दावा
| Updated on: May 24, 2024 | 2:19 PM
Share

बॉलिवूडची ड्रामा क्वीन गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे चर्चेत आहे. राखीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकताच राखीचं ऑपरेशन झालं आहे. राखीच्या यूट्रसमध्ये ट्यूमर होता, तो सर्जरी करून काढण्यात आला आहे. सर्जरी करून काढण्यात आलेला ट्यूमर आता तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. राखीचं तब्बल तीन तास ऑपरेशन सुरु होतं. राखीचं ऑपरेश यशस्वी झालं आहे. पण अद्याप संकट टळलेलं नाही… असं वक्तव्य राखी सावंतच्या पहिल्या पतीने केलं आहे. काही महिने राखीला बेडरेडस्ट करायला सांगितलं आहे. एवढंच नाहीतर, आणखी 15 दिवस राखी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहे.

राखीचा पहिला पती रितेशने दिलेल्या माहिती नुसार, ‘ट्यूमर तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कॅन्सरचा ट्यूमर असेल तर, किमो आणि अन्य उपचार सुरु करावे लागतील. कॅन्सरचं निदान व्हायला नको म्हणून आम्ही सगळे प्रार्थना करत आहोत. जर कॅन्सरचं निदान झालं तर, राखीला उपचारासाठी परदेशात घेऊन जाणार… राखीची मी एक पती म्हणून नाहीतर, मित्र म्हणून काळजी घेईल…’ सध्या सर्वत्र राखीच्या प्रकृतीची चर्चा होत आहे.

राखीला मिळत आहे जीवेमारण्याची धमकी…

राखीला जीवेमारण्याची धमकी मिळत असल्याचा दावा देखील रितेश याने केला आहे. राखीला सतत जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. राखीसोबत मला देखील जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे रितेशने आदिल खानवर आरोप लावले आहेत.

आदिलचं नाव न घेत रितेश म्हणाला, ‘मला माहिती आणि आमचा शत्रू कोण आहे. जेव्हा माझ्याकडे पुरावे असतील तेव्हा मी त्या व्यक्तीबद्दल बोलेल.’ गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील राखीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

राखीच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता. रितेश गेल्या काही दिवसांपासून राखीची काळजी घेताना दिसत आहे.

Follow Us
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?