AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Dose : फिटनेस-टाईम मॅनेजमेंटसाठी रकुलप्रीतचा नवा फंडा, तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय

परफेक्ट फिगरसाठी अनेक कलाकार स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतात. (Rakulpreet's new idea for fitness-time management)

Fitness Dose : फिटनेस-टाईम मॅनेजमेंटसाठी रकुलप्रीतचा नवा फंडा, तुम्हीसुद्धा करू शकता ट्राय
VN
VN | Updated on: Jan 14, 2021 | 5:35 PM
Share

मुंबई : परफेक्ट फिगरसाठी अनेक कलाकार स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतात. बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसुद्धा या बाबतीत मागे नाही. ती अनेक वेळा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सायकल चालवताना दिसतीये. रकुलप्रीतनं फिटनेस सोबतच टाईम मॅनेजमेंटसाठी सायकल चालविली आहे. तिच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्हीही स्वत: ला फिट ठेवू शकता.

सायकलिंगचे फायदे फिटनेसच्या बाबतीत सायकलिंगचे अनेक फायदे आहेत. सायकलिंगमध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते, वजन कमी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढते . सायकलिंग कर्करोग आणि हृदयरोगांपासून देखील संरक्षण करते. सायकल चालवल्यानं शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह व्यवस्थित होतो, ज्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

सायकलिंगमुळे आयुष्य वाढतं काही संशोधनात असंही समोर आलंय की दैनंदिन जीवनात सायकल चालवल्यानं आयुष्य वाढतं. याच कारणामुळे मोठ्या शहरांमधील काही लोक आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सायकलचा वापर करत ऑफिसमध्ये जाऊ लागले आहेत. जर तुम्ही दररोज व्यायाम करू शकत नसाल तर सायकल चालवा. त्यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहिल.

रकुलनं यापूर्वीही लोकांना प्रेरणा दिली रकुलप्रीतनं यापूर्वी देखिल अनेक वेळा लोकांना फिटनेसबद्दल जागृत केलं आहे. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या इंस्टा वॉलवर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत होती ज्यामध्ये ती जिम वर्कआउट्स, योगा, रनिंग आणि कधी कधी गोल्फ खेळताना दिसली. एवढंच नाही तर यापूर्वी तिनं 30 किमी सायकलिंगसुद्धा पूर्ण केलंय. तर या वेळी तिनं 12 किमी सायकल चालविली आहे. ‘टाईम मॅनेजमेंटसाठी मी सायकल चालवत आहे. #12 किमी’ असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

संबंधित बातम्या 

Fitness Tips | ना व्यायाम, ना डाएट तरीही राहता येईल तंदुरुस्त! जाणून घ्या ‘हे’ फंडे…

Skin Care | चमकदार त्वचा हवीय? घरच्या घरी ट्राय करा ‘वॉलनट स्क्रब’!

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!