AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Tips | ना व्यायाम, ना डाएट तरीही राहता येईल तंदुरुस्त! जाणून घ्या ‘हे’ फंडे…

व्यायामाशिवायही आपण तंदुरुस्त राहू शकतो, मात्र यासाठी आपल्याला इतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Fitness Tips | ना व्यायाम, ना डाएट तरीही राहता येईल तंदुरुस्त! जाणून घ्या ‘हे’ फंडे...
| Updated on: Jan 13, 2021 | 7:06 PM
Share

मुंबई : आजकाल खराब जीवनशैली आणि सततची धावपळ या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. असे म्हणतात की, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.  व्यायामामुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकता. केवळ व्यायामामुळेच आपले शरीर तंदुरुस्त राहू शकते. व्यायामाशिवायही आपण तंदुरुस्त राहू शकतो, मात्र यासाठी आपल्याला इतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे (How to stay healthy without exercise and diet).

अशा परिस्थितीत आपण व्यायामाशिवाय आपल्या आरोग्याची काळजी कशी घेऊ शकता हे आपल्याला माहिती असणे देखील गरजेचे आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे टाळायचे असल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव आपण व्यायाम करण्यास अक्षम असाल, तर आपण ‘या’ प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

डॉक्टर नवीन मॅथ्यू जोसच्या मते, फक्त खाणे-पिणेच नाही, तर तंदुरुस्त राहण्यासाठी इतरही बरेच मार्ग आहेत. डॉक्टरांच्या मते, लोकांशी संपर्क साधण्याचे डिजिटल मार्ग कमी केला पाहिजे आणि थेट लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. ते म्हणाले की, ‘प्रत्येक 30 मिनिटांनी आसन स्थिती बदला यामुळे देखील आपण तंदुरुस्त राहू शकता. तसेच तांत्रिक उपकरणांचा कमीत कमी वापर करावा.’

न्यूट्रीशीनिस्ट आकाश सिंह यांच्या मते, जर व्यायामाशिवाय फिट रहायचे असेल तर आपल्याला बर्‍याच गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

संतुलित आहार

आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून तंदुरुस्त राहू शकता. यासाठी, आपल्याला जेवण कमी करण्याची आवश्यकता नाही. तर त्याऐवजी आपल्या आरोग्य लक्षात घेऊन डाएट प्लॅन बनवा. या डाएट प्लॅननुसार आपण भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा. तसेच, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणे टाळा. तसेच, थोड्या-थोड्या वेळाने काहीना काही खात राहा (How to stay healthy without exercise and diet).

लिफ्टचा वापर कमी करा.

जर आपले घर दुसर्‍या-तिसर्‍या मजल्यावर असेल, तर पायऱ्यांचा वापर करण्यास सुरूवात करा. या ऐवजी एखादे टार्गेट सेट करून, आपण त्यानुसार चालणे सुरू करू शकता. यामुळे केवळ आपले आरोग्यच’ सुधारत नाही, तर त्याचा आपल्या मनःशक्तीवरही मोठा परिणाम होतो.

ताणतणाव टाळा

खरं तर, या दिवसांमध्ये या जीवनशैलीमध्ये तणाव खूप सामान्य गोष्ट आहे. या तणावामुळे लोकांना सतत आरोग्याशी निगडीत समस्या येत असतात. ताणतणावामुळे हृदयरोग, मधुमेह, नैराश्य, दमा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून शक्य तितका ताणतणाव टाळा. असे केल्याने आपण व्यायामाशिवाय किंवा आहार नियंत्रणाशिवाय तंदुरुस्त राहू शकाल.

भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीतकमी एक लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. यासाठी दर तासाला दोन ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. या प्रमाणे दिवसातून किमान 24 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे अनेक  आजार आपल्या शरीरापासून दूर राहतील.

(How to stay healthy without exercise and diet)

हेही वाचा :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.