RRR फेम रामचरण – ज्युनियर एनटीआरच्या मैत्रीत फूट? ऑस्कर पुरस्कार ठरलं कारण?

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म न केल्यानेही चाहत्यांमध्ये वादाबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता. या दोघांना ऑस्करच्या मंचावर परफॉर्म करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र दोघांनी नकार दिला.

RRR फेम रामचरण - ज्युनियर एनटीआरच्या मैत्रीत फूट? ऑस्कर पुरस्कार ठरलं कारण?
Ram Charan and Jr NTRImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:05 AM

हैदराबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर यातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर असे दोन अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारही पटकावले. ‘आरआरआर’मधील रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. चित्रपटात ऑनस्क्रीन या दोघांची मैत्री दाखवण्यात आली. तर ऑफस्क्रीनही दोघे एकमेकांचे खास मित्र आहेत. मात्र त्यांच्या मैत्रीत फूट पडल्याची माहिती समोर येत आहे.

रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांची मैत्री जगजाहीर आहे. या दोघांच्या ऑफस्क्रीन मैत्रीमुळे ऑनस्क्रीनही दमदार कामगिरी पहायला मिळाली. मात्र जेव्हा ऑस्करसाठी परदेशात चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन करत होती, तेव्हा ज्युनियर एनटीआर आणि रामचरण एकमेकांपासून लांबच राहिले. 27 मार्च रोजी रामचरणने त्याचा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीमध्येही ज्युनियर एनटीआरला पाहिलं गेलं नाही.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

रामचरणने पत्नी उपासनासोबत हैदराबादमध्ये आपला 38 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसासोबतच त्याने ऑस्करच्या विजयाचा आनंदही साजरा केला. त्यामुळे हे दुहेरी सेलिब्रेशन होतं. मात्र या सेलिब्रेशनमध्ये ज्युनियर एनटीआर न दिसल्याने चाहत्यांमुळे पुन्हा दोघांच्या वादासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले.

“या दोघांमधील वाद खरंच आहे. आरआरआरला प्रचंड यश मिळालं. परदेशातही त्याचं प्रमोशन झालं. मात्र या सर्वांत रामचरण आणि ज्युनियर एनटीआर एकमेकांपासून दूर गेले. रामचरणला सर्वाधिक प्रसिद्धी मिळतेय असं ज्युनियर एनटीआरला वाटलं आणि त्यात चुकीचं काहीच नव्हतं”, अशी माहिती हैदराबादमधील सूत्रांनी दिली.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्म न केल्यानेही चाहत्यांमध्ये वादाबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता. या दोघांना ऑस्करच्या मंचावर परफॉर्म करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र दोघांनी नकार दिला. ऑस्कर निर्माते राज कपूर यांनी सांगितलं होतं की रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांना रिहर्सलसाठी पुरेसा वेळ नसल्याने ते लाइव्ह परफॉर्म करण्यासाठी कम्फर्टेबल नव्हते. मात्र आता त्यामागील दुसरं कारण समोर आलं आहे. रामचरण परफॉर्म करण्यासाठी खूपच उत्सुक होता, मात्र ज्युनियर एनटीआरने नकार दिल्याचं म्हटलं जातंय.

“ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू गाण्यावर परफॉर्म करण्यासाठी रामचरण खूप उत्सुक होता. मात्र ज्युनियर एनटीआरने सरावासाठी कमी वेळ असल्याचं म्हटलं. खरंतर ज्युनियर एनटीआर रामचरणसोबत स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी कॉन्फिडन्ट नव्हता. त्याला दोघांची तुलना नको होती”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...