Tamannaah Bhatia | जगातील पाचव्या महागड्या हिऱ्याची मालकीण आहे तमन्ना; खास व्यक्तीकडून मिळालं गिफ्ट

सध्या तमन्ना भाटिया हिच्यावर होतोय प्रेमाचा वर्षाव... विजय वर्मा नाही तर, 'या' खास व्यक्तीने तमन्ना हिला दिला जगातील सर्वात महागडा हिरा गिफ्ट... सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Tamannaah Bhatia | जगातील पाचव्या महागड्या हिऱ्याची मालकीण आहे तमन्ना; खास व्यक्तीकडून मिळालं गिफ्ट
| Updated on: Jul 24, 2023 | 2:29 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. जी करदा(Jee Karda) या वेब सीरिजनंतर अभिनेत्रीने लस्ट स्टोरीज 2(Lust Stories 2) सिनेमात देखील दमदार भूमिका बजाबत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रुपेरी पडद्यावर वेग-वेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय तमन्ना तिच्या सौंदर्यांमुळे देखील कायम चर्चेत असते. तमन्ना हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

तमन्ना कायम तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सने चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनेत्रीकडे महागड्या डायमंडच्या दागीन्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्रीकडे जगातील पाचव्या महागड्या हिऱ्याची देखील अंगठी आहे. ही अंगठी अभिनेत्रीने स्वतः खरेदी केली नसून एका खास व्यक्तीने अभिनेत्रीला महागड्या हिऱ्याची अंगठी गिफ्ट म्हणून दिली आहे.

 

 

रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये अभिनेत्रीला साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी हिने हिऱ्याची अंगठी भेट दिली होती. तमन्ना स्टारर Sye Raa Narasimha Reddy सिनेमातील उत्कृष्ट अभिनयाने प्रभावित होऊन उपासना हिने अभिनेत्रीला जगातील पाचवा सर्वात महागडा हिरा भेट दिला होता. रिपोर्टनुसार या अंगठीची किंमत 2 कोटींहून अधिक आहे. तमन्ना हिच्याकडे असणाऱ्या अंगठीचा फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उपासनाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री तमन्ना भाटियाचा हिऱ्याच्या अंगठीसह एक फोटो शेअर केला होता. उपासना हिने पोस्ट शेअर केल्यानंतर तमन्ना हिने राम चरण याच्या पत्नीचे आभार मानले होते. ‘या बॉटल ओपनरशी अनेक आठवणी जोडल्या आहेत. इतक्या दिवसांनी तुम्हाला भेटून खूप छान वाटलं.. लवकरच पुन्हा भेट होईल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Sye Raa Narasimha Reddy सिनेमात तमन्ना हिच्यासोबत, अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपति, नयनतारा यांनी निहारिका मुख्य भूमिका साकारली होती. तमन्ना हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री नुकताच, बॉयफ्रेंड आणि अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसली होती.