Ramayan 3D | ‘सीता’ बनलेल्या दीपिकाचा नायक बदलणार? हृतिक रोशनऐवजी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता!

अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) ही ‘रामा’च्या भूमिकेत दिसणार होता. पण आता मधु मंटेना या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्याला निवडणार असल्याचे कळते आहे.

Ramayan 3D | ‘सीता’ बनलेल्या दीपिकाचा नायक बदलणार? हृतिक रोशनऐवजी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता!
‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिकानं 25 कोटी मानधन घेतलं आहे.
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:34 AM

मुंबई : ‘रामायण 3डी’ (Ramayan 3D)  या पीरियड ड्रामा चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत निर्माते मधु मंटेना (Madhu Mantena) चित्रपटातील ‘राम-सीते’ची जोडी बदलणार असल्याचे कळते आहे. काही काळापूर्वी त्यांनी ‘रामायण 3डी’ची घोषणा केली होती. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सीतेच्या भूमिकेत दिसणार असून, माध्यम अहवालानुसार अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) ही ‘रामा’च्या भूमिकेत दिसणार होता. पण आता मधु मंटेना या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्याला निवडणार असल्याचे कळते आहे. दीपिका ‘सीता’ सकारात असलेल्या या चित्रपटात दक्षिणचा सुपरस्टार ‘रामा’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे (Ramayan 3D update south superstar Mahesh Babu will seen as Ram in film).

रिपोर्ट्सनुसार तेलुगु सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) दीपिकाच्या या चित्रपटात ‘भगवान रामा’च्या भूमिकेत दिसू शकतो. पण पिंकविलाच्या अहवालानुसार, महेश बाबूच्या टीमने ‘रामायण 3 डी’साठी त्याच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

मात्र, जर महेश बाबूने ‘रामायण’ या चित्रपटाला होकार दिला, तर हा त्याचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट ठरेल. हिंदी चित्रपटांसाठी त्याच्याशी बर्‍याचदा संपर्क साधला गेला होता. पण प्रत्येक वेळी त्याने चित्रपटांना नकार दिला. त्यामुळे यावेळी तो दीपिकासोबत ‘राम’ बनण्यास होकार देईल की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रभासलाही झाली होती विचारणा!

या आधी या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. परंतु, ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो आधीपासूनच ‘रामा’ची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यानंतर, लगेचच मधु मंटेनाने ‘रामायण 3 डी’ची घोषणा केली. चित्रपटासाठी त्याला निर्माते देखील मिळाले आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची टीम एका अशा सुपरस्टारचा शोध घेत आहे, जो ‘रामा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकेल आणि त्यांच्या मते, महेश बाबू या भूमिकेत चपखल बसेल (Ramayan 3D update south superstar Mahesh Babu will seen as Ram in film).

फँटम फिल्म्स एकट्याने चालवणार!

स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेनाने, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून फँटम फिल्म्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. आता फँटम फिल्म तो एकट्याने चालवणार आहे. फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तो आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जात आहे की, मधु मंटेना त्यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करणार आहे. कारण, इतक्या मोठ्या महाकाव्याची कथा एका चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे कठीण आहे.

व्यस्त दीपिका!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हृतिक रोशनसोबत ती ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय ती शाहरुख खानच्या ‘पठाण’, शकुन बत्राच्या एका आगामी रोमँटिक चित्रपटातही दिसणार आहे.

(Ramayan 3D update south superstar Mahesh Babu will seen as Ram in film)

हेही वाचा :

Chehre Update | अमिताभ-इमरानच्या ‘चेहरे’ला कोरोना पुन्हा फटका! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

Well done baby : अखेर प्रतिक्षा संपली, पुष्कर जोग आणि अमृता खानविलकरच्या ‘वेल डन बेबी’चा मुहूर्त ठरला

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.