‘रामायण’मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना किती मिळायचं मानधन?

रामायणने प्रत्येक एपिसोडसाठी बराच नफा कमावला होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मालिकेला 53 विविध देशांमधील तब्बल 650 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिलं आहे. रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर रामायण साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

'रामायण'मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना किती मिळायचं मानधन?
'रामायण'मध्ये सर्वाधिक मानधन कोणाला? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 1:52 PM

मुंबई : 13 मार्च 2024 | रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. इतक्या वर्षांनंतर आजही या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. यामध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांना आजही तितक्याच आदराने आणि प्रेमाने वागणूक दिली जाते. चाहते अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची देवासारखी पूजा करतात. लॉकडाऊनमध्ये जेव्हा ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली, तेव्हा प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता. रामायण या मालिकेच्या एका एपिसोडने तर वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाच्या एपिसोडने हा विक्रम मोडला होता. या मालिकेत काम करणाऱ्यांना मानधन किती मिळायचं हे तुम्हाला माहित आहे का?

सर्वाधिक मानधन कोणाला?

मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली होती. त्यांनाच सर्वाधिक मानधन मिळत होतं. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरुण गोविल यांना संपूर्ण मालिकेसाठी 40 लाख रुपये मिळाले होते. तर सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना अरुण यांच्यापेक्षा निम्मी फी मिळाली होती. दीपिका यांनी 20 लाख रुपये मानधन मिळालं होतं. दीपिका यांचं मानधन मालिकेत हनुमान आणि रावण यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपेक्षाही कमी होतं.

लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांना मानधन किती?

अभिनेते सुनील लहरी या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारत होते. रिपोर्ट्सनुसार त्यांना 25 लाख रुपये मानधन मिळालं होतं. तर हनुमानाच्या भूमिकेतील दारा सिंह यांना 35 लाख रुपये आणि रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी यांना 30 लाख रुपये मिळाले होते. या तिन्ही कलाकारांना दीपिका यांच्यापेक्षा अधिक मानधन मिळालं होतं.

हे सुद्धा वाचा

रामानंद सागर यांनी रामायण साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रत्येक एपिसोड बनवण्यासाठी जवळपास 9 लाख रुपये खर्च केले होते. या हिशोबाने संपूर्ण मालिकेचा खर्च हा जवळपास 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्याकाळी ही रक्कम सर्वसामान्य मालिका किंवा चित्रपटांपेक्षा बरीच जास्त होती. त्याकाळचे 9 लाख रुपये म्हणजे आजच्या काळातील जवळपास 1 कोटी रुपये. रामायण या मालिकेचा पहिला एपिसोड 25 जानेवारी 1987 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर कोरोना काळात पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Non Stop LIVE Update
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.