AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : आदिनाथ कोठारे फेम ‘रामायण’ पाहायला जाताय, चित्रपटगृहात ‘हे’ कृत्य करुच नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Ramayana : 'रामायण' सिनेमाचा सर्वत्र बोलबाला सुरु आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सिनेमाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत, चित्रपटगृहात असं कृत्य केल्यास कठोर कारवाई होऊ शकते... असं सांगण्यात येत आहे.

Ramayana : आदिनाथ कोठारे फेम 'रामायण' पाहायला जाताय, चित्रपटगृहात 'हे' कृत्य करुच नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
Ramayana
| Updated on: Nov 09, 2026 | 11:15 AM
Share

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे, यश आणि अभिनेत्री साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ सिनेमाच्या निर्मात्यांनी सक्त कारवाई करण्याचा निर्यण घेतला आहे. एकीकडे सिनेमाने जगभरात 375 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे, तर दुसरीकडे, चित्रपटगृहांमध्ये सिनेमाचं अनधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या आणि ते सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करणाऱ्यांना सिनेमाच्या टीमने कायदेशीर नोटीस जारी करणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबर 2026 आणि 6 नोव्हेंबर 2026 रोजी दिलेल्या आदेशांद्वारे सर्वांना विनापरवांग सिनेमा किंवा सिनेमाचा कोणताही भाग रेकॉर्ड करणं, अपलोड करणं, शेअर करणं आणि इतर कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यास मनाई केली आहे, असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हा आदेश त्या सर्व लोकांवर लागू होईल, मग त्यांची ओळख माहिती असो किंवा नसो. चित्रपटाच्या टीमनुसार, परवानगीशिवाय चित्रपटाचे रेकॉर्डिंग करणे किंवा तो ऑनलाइन शेअर करणे हे कॉपीराइटचे उल्लंघन आहे. असे करणाऱ्यांवर कॉपीराइट ॲक्ट 1957, सिनेमॅटोग्राफ ॲक्ट 1952, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 आणि आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत कारवाई होऊ शकते. याशिवाय याला न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) देखील मानले जाऊ शकते.

पूर्वीच अपलोड केलेले व्हिडिओ हटवण्याचे निर्देश

‘रामायण’ सिनेमाच्या निर्मात्यांनी लोकांना आवाहन केलंआहे की त्यांनी सिनेमाचं रेकॉर्डिंग करणं, तो पोस्ट करणं किंवा शेअर करणं टाळावं. तसेच, ज्या लोकांनी आधीच अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, त्यांना ते तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार संबंधित अधिकारी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडे केली जाईल. अशा लोकांविरुद्ध कारवाई देखील केली जाऊ शकते.

‘रामायण’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘रामायण: पार्ट 1’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत जगभरात एकूण 375.50 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केलं आहे. भारतात सिनेमाचं नेट कलेक्शन 182.70 कोटी रुपये राहिलं, तर इंडिया ग्रॉस कलेक्शन 218.25 कोटी रुपये नोंदवले गेले. तसेच, या सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमधून 157.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
CM फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! अंधारे असं का म्हणाल्या?
Sushma Andhare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात! सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या....
Nashik : त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा ईमेल; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; खेरवाडीत AQI 264 वर, तर....
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता....
Jejuri Khandoba Yatra : सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भक्तीचा महापूर; पहाटे 5 वाजता शाही स्नानासाठी पालखी रवाना, पाहा भक्तिमय सोहळा
गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज..
Gokul : गोकुळवरून कोल्हापुरात राजकीय रणसंग्राम; सतेज पाटलांच्या नेतृत्वात आज मोर्चा, धनंजय महाडिक म्हणाले...
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी