AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Trailer: कसा आहे तब्बल 4000 कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर? प्रभू श्रीराम, लंकापती तर दिसले पण हनुमान..

Ramayana Trailer: 'रामायण' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे, ते पहा..

Ramayana Trailer: कसा आहे तब्बल 4000 कोटींच्या 'रामायण'चा ट्रेलर? प्रभू श्रीराम, लंकापती तर दिसले पण हनुमान..
रामायण ट्रेलरImage Credit source: Youtube
| Updated on: Jul 30, 2026 | 8:51 AM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. आज (30 जुलै) पहाटे 4.15 वाजता ब्रह्ममुहूर्तावर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमधील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर आणि लंकापती रावणाच्या भूमिकेतील अभिनेता यशने सर्वांनाच थक्क केलं आहे. या चित्रपटात रणबीर आणि यश यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळणार असून त्याची एक झलक ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये दिसली. जवळपास 4 मिनिटं 9 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय या सर्वांच्या भूमिका पहायला मिळत आहेत.

‘रामायण’ या ट्रेलरची सुरुवातच यशच्या एण्ट्रीने होते. एका फकिराच्या वेशात तो राजवाड्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा रक्षक त्याला विचारतात, “तू कोण आहेस?” त्यावर रावणाच्या भूमिकेतील यश उत्तर देतो, “तुमचा नवीन राजा”. त्यानंतर तो जोरात लाथ मारून राजवाड्याचा भव्य दरवाजा उघडतो आणि आत प्रवेश करतो. “देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक.. या तिन्ही लोकांमध्ये फक्त एकाचंच राज्य असेल.. रावणराज” या संवादाने रावणाच्या शक्तीशाली भूमिकेची ओळख करून दिली जाते. त्यानंतर राजा दशरथ यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यज्ञ आणि हवन करताना दिसतात.

पहा ट्रेलर

प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील रणबीर कपूर महाकाय प्राणी आणि विविध राक्षसांशी लढताना दिसतो. कैकेयीच्या भूमिकेतील लारा दत्ता, सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील रवी दुबे, शूर्पणखाच्या भूमिकेतील रकुल.. हेसुद्धा विशेष लक्ष वेधून घेतात. या संपूर्ण ट्रेलरमध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता सनी देओल याची कोणतीच झलक पहायला मिळत नाही. ‘रामायण’ या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावर जोरदार टीका झाली होती. व्हिज्युअल इफेक्ट्स, तसंच राक्षसांना पशूंच्या रुपात दाखवल्याबद्दल टीका झाली होती. मात्र 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील कार्यक्रमात जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, तेव्हा त्याचं सर्वत्र कौतुक झालं.

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून दोन्ही भागांचं बजेट तब्बल 4000 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. हा पहिला भाग यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा