Hardeek  Joshi | कुस्तीचा आखाडाच नव्हे, ‘राणा दा’ आता कोल्हापूरची ‘खाऊ गल्ली’ गाजवणार!

प्रेक्षकांचा लाडका ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) ‘कुस्तीचा आखाडा’ गाजवल्यानंतर कोल्हापूरची ‘खाऊ गल्ली’ देखील गाजवण्यास सज्ज झाला आहे.

Hardeek  Joshi | कुस्तीचा आखाडाच नव्हे, ‘राणा दा’ आता कोल्हापूरची ‘खाऊ गल्ली’ गाजवणार!
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘राणा दा’ साकारुन अभिनेता हार्दिक जोशी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला.

मुंबई : प्रेक्षकांचा लाडका ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) ‘कुस्तीचा आखाडा’ गाजवल्यानंतर कोल्हापूरची ‘खाऊ गल्ली’ देखील गाजवण्यास सज्ज झाला आहे.  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका नुकतीच किंही महिन्यांपूर्वी ऑफ एअर गेली आहे. ही मालिका गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंची जोडी आजही सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी आहे. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी या मालिकेवर आणि मालिकेमधील कलाकारांवरील प्रेक्षकांचं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं (RanaDa fame Actor Hardeek Joshi enters in food business).

या मालिकेतला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. सर्वांच्या लाडक्या राणादाच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे. ‘राणा दा’ अर्थात हार्दिक जोशीने नुकतंच व्यसायात पदार्पण केलं आहे.

हार्दिकचा देसी कोल्ड्रींक ब्रँड!

‘कोल्हापूर बदाम थंडाई’ हा देसी कोल्ड्रींक ब्रँड हार्दिक जोशी कोल्हापूरकरांच्या भेटीला घेऊन आला आहे. हा त्याचा स्वत:चा फूड ब्रँड आहे. त्याचा सर्वांनी आस्वाद घेण्याचं आवाहन त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत केलं आहे.

व्यवसायात पदार्पण!

हार्दिक जोशीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट शेअर करत म्हटले की, ‘आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलं, आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझा सोबत राहील हा मला विश्वास आहे…कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक 25 फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपल्या सेवेत…मग काय येणार नव्हं? यायला लागतंय…चालतय की..या सायंकाळी 4.00 नंतर खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर!’(RanaDa fame Actor Hardeek Joshi enters in food business)

मुळचा मुंबईचा!

अभिनेता हार्दिक जोशी हा मुळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याच शिक्षण आणि बालपण देखील मुंबईतच गेलं. मात्र, मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याला कोल्हापुरात राहावं लागलं होतं. तब्बल चार ते साडे चार वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलेल्या हार्दिकला कोल्हापूरचा आणि तिथल्या लोकांचा लळा लागला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडेलिंग करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने ‘रंगा पतंगा’ यासरख्या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. तसेच, त्याने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

अभिनय नव्हे, आर्मीत जाण्याची होती इच्छा!

कॉलेजमध्ये असताना हार्दिक मॉडेलिंग करायचा. पण त्यात करिअर करण्याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. त्याला आर्मीत करिअर करायचं होतं. 2011मध्ये त्याची आर्मीत निवडही झाली होती. त्यावेळी चंदीगडमध्ये एसएसबीचं (सशस्त्र सीमा दल) ट्रेनिंगही त्यानं पूर्ण केलं होतं. पण काही कारणामुळे त्याला कॉल आला नाही. मात्र, अजूनही आर्मीत जाण्याची माझी इच्छा आहे, असं हार्दिक म्हणतो. एसएसबीमध्ये निवड न झाल्याने, तो मुंबईला परत आला आणि फोटोशूट केलं. तिथूनच त्याचा मनोरंजन विश्वातला प्रवास सुरु झाला होता. आता पुन्हा एकदा नव्याने तो व्यवसायात पदार्पण करत आहे. अशावेळी त्याने आपल्या चाहत्यांचा पाठींबा मागितला आहे.

(RanaDa fame Actor Hardeek Joshi enters in food business)

हेही वाचा :

Drishyam 2 : पुन्हा सस्पेन्स, पुन्हा रोमांच; दृश्यम-2 ची तयारी सुरु!

निक्की तांबोळी लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI