Ranbir Kapoor | लव्ह रंजन चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर दिल्लीत, चाहत्यांकडून जंगी स्वागत!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी लव रंजन या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईवरून दिल्लीला पोहचला आहे.

Ranbir Kapoor | लव्ह रंजन चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर दिल्लीत, चाहत्यांकडून जंगी स्वागत!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी लव्ह रंजन या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईवरून दिल्लीला पोहचला आहे. रणबीरला दिल्ली विमानतळावर बघितले गेले आहे. त्यावेळी रणबीरच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांत या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. रणबीरच्या या चित्रपटसाठी चाहते उत्साही आहेत. रणबीरचा विमातळावरील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ रणबीरच्या एका फॅनने तयार केला आहे. (Ranbir Kapoor in Delhi for the shooting of Love Ranjan Movie)

लव्ह रंजन  चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भुमिकेत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) दिसणार आहे. श्रद्धा देखील चित्रपटाच्या टीमसह दिल्लीला पोहोचली आहे. तिने नुकताच चित्रपटाच्या टीमसह हॉटेलमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलं होते.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

Shocking | शाहिद कपूरला सोशल मीडियावर काम मागण्याची वेळ, या अवस्थेला मीरा राजपूत जबाबदार?

Sonu Sood Vs BMC | अभिनेता सोनू सूदची BMC विरोधात याचिका, कोर्टाच्या सुनावणीकडे चाहत्यांचं लक्ष!

(Ranbir Kapoor in Delhi for the shooting of Love Ranjan Movie)

Published On - 12:26 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI