रणबीर कपूरच्या लहानपणीच्या होळीतील भयानक आठवण, म्हणाला ” कपूर घराण्यात होळी फार भयानक….”
कपूर कुटुंबातील होळी साजरी करण्याची पद्धत ही ऐकेकाळी प्रसिद्ध होती. मात्र रणबीर कपूरच्या होळीच्या आठवणी म्हणाव्या तेवढ्या चांगल्या नाहीयेत. त्याला होळीच्या वेळी आलेल्या वाईट अनुभवांबद्दल त्याने स्वत:च सांगितलं आहे.

चाहत्यांना बॉलीवूड इंडस्ट्रीमधील होळीच्या मनोरंजक गोष्टी ऐकायला आणि जाणून घ्यायला नक्कीच आवडतात. त्यातल्या त्यात बॉलिवूडमधील घराण्यांबद्दल काही चर्चा असतील तर त्याबद्दलही जाणून घ्यायला चाहत्यांना नक्कीच आवडतं. त्यातीलच एक म्हणजे कपूर घराणं. कपूर कुटुंबात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते राज कपूर हे त्यांच्या सर्वोत्तम होळी पार्टी आयोजित करण्यासाठी देखील ओळखले जात होते. अनेक वर्षांपासून, कपूर कुटुंब आरके स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात होळी पार्टी आयोजित करत असे. या पार्टीला अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित राहायच्या. एकीकडे, कपूर कुटुंबातील लोकांनी पार्टीचा मनापासून आनंद घेतला. मात्र रणबीर कपूरसाठी होळीचा अनुभव तेवढा मजेदार नक्कीच नव्हता. त्याच्या होळीच्या बाबतीत अतिशय वाईट आठवणी असल्याचं तो सांगतो.
कपूर घराण्याच्या होळीच्या पार्ट्यांची आठवण
रणबीर कपूरने स्वतः एकदा राज कपूरच्या प्रसिद्ध होळी पार्ट्यांबद्दल काही किस्से सर्वांसोबत शेअर केले होते. यासोबतच त्याने त्याचा भयानक अनुभवही सांगितला. डिसेंबर 2024 मध्ये राज कपूर यांच्या 100 व्या जयंती समारंभाच्या आधी, रणबीर कपूरने 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI)हजेरी लावली होती तेव्हा या कार्यक्रमात चित्रपट निर्माते राहुल रवैल यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, रणबीरने आरके स्टुडिओमध्ये राज कपूरच्या प्रसिद्ध होळी पार्ट्यांबद्दल सांगितलं .
रणबीरच्या होळीच्या आठवणी
रणबीरने सांगितलं की, हे सेलिब्रेशन बॉलिवूडमध्ये खूप मोठ्या पातळीवर आयोजित केले जात होते. ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि नर्गिस सारख्या सुपरस्टारपासून ते प्रॉडक्शन स्टाफ आणि क्रू मेंबर्सपर्यंत चित्रपट उद्योगातील मोठे नाव एकत्र येत असे. तसेच, या पार्ट्या त्यांच्या भव्यतेसाठी आणि मौजमजेसाठी ओळखल्या जात होत्या. रणबीरच्या मते, त्याच्या बालपणी त्याला या पार्ट्या खूप त्रासदायक आणि कधीकधी भीतीदायक वाटायच्या. त्याच्यामागे एक कारण देखील आहे.
रणबीरच्या होळीच्या वाईट आठवणी
रणबीरने सांगितले की उत्सव इतके उत्साही आणि रंगलेले असायचे की कोणालाही ओळखणे कठीण होते. रणबीर म्हणाला, “मी खूप लहान होतो, त्यामुळे ते वातावरण माझ्यासाठी खूप भीतीदायक होते. सर्वांना काळ्या रंगात रंगवले होतं आणि वेगवेगळ्या रंगात, सर्वांना ट्रकमध्ये टाकलं जात होतं. मला वाटतं तुमचे होळीबाबतचे आठवणी चांगल्या असतील, सगळे काळे, निळे आणि पिवळे दिसत दिसायेच. हा एक दिवसाचा उत्सव असायचा.” अशा पद्धतीने त्याने तिच्या वाईट आठवणींचा अनुभव सांगितला.
कपूर कुटुंबाला होळी पार्टी का थांबवावी लागली?
राज कपूरच्या होळी पार्टीत गर्दी वाढू लागली, ज्यामुळे गोष्टी नियंत्रित करणे कठीण व्हायला लागल्या. अशा परिस्थितीत त्यांनी होळीच्या पार्ट्या आयोजित करणे बंद केलं. त्या पार्ट्यांमध्ये स्वतः सहभागी झालेल्या राहुल रवैलने पार्ट्या का थांबवण्यात आल्या हे सांगितलं. “हळूहळू, गर्दी वाढल्याने या पार्ट्या बंद झाल्या,” असं तो म्हणाला.