‘रामायण’ साठी नॉनव्हेज अन् सिगारेट सोडल्याचा रणबीर कपूरचा दावा; ‘जंगली मटण’चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रणबीरची पोलखोल?
'रामायण' चित्रपटासाठी मांसाहार सोडल्याचा दावा रणबीर कपूरने केला होता. पण त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. या शोमधील एका व्हायरल व्हिडिओमध्ये तो मांसाहारी पदार्थ जेवत असल्याचा युजर्सने पाहिल्यामुळे त्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आहे. नेटकऱ्यांनी यानंतर रणबीरला खोटारडा आणि ढोंगी म्हणत प्रचंड ट्रोल केलं आहे.

बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंब नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत. आताही कपूर फॅमिली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या डॉक्यूमेंट्रीमुळे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हा शो ठेवला होता. या शोमध्ये त्यांनी कुटुंबाबद्दल तसेच एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल सांगितलेले पाहायला मिळाले.व त्यावेळी मेजवाणीला देखील खूप वेगवेगळे मेन्यू टेबलावर दिसत होते. ही डॉक्युमेंट्री तर सर्वांना आवडलीच पण यामुळे रणबीर कपूर मात्र अडचणीत सापडला आहे.
रामायण चित्रपटासाठी रणबीर कपूरने दारू आणि मांसाहार सोडल्याचं म्हटलं होतं
रणबीर कपूर सध्या दोन मोठ्या प्रोजेक्ट्सच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. एक म्हणजे नितेश तिवारीचा ‘रामायण’ आणि दुसरा म्हणजे आलिया भट्ट आणि विकी कौशल सोबतचा ‘लव्ह अँड वॉर’. चाहते रणबीर कपूरच्या रुपेरी पडद्यावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.तसेच रणबीर स्वत: देखील रामायण या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलं होतं. एवढंच नाही तर रामायण या चित्रपटाच्या शुटींगमुळे तसेच त्याने या चित्रपटात रामाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या चित्रपटाची शुटींग पूर्ण होत नाही तोपर्यंत रणबीर कपूरने दारू आणि मांसाहार सोडल्याचं म्हटलं होतं. चित्रपटात भगवान रामची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सात्विक आहार आणि जीवनशैली पाळत असल्याचं म्हटलं होतं. तो ध्यानधारणा आणि सकाळचे व्यायाम करतो असंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलेलं.
जंगल मटण आणि पाया सारखे पदार्थ ताटात असल्याचा व्हिडीओ
पण रणबीर कपूर ‘डायनिंग विथ द कपूर्स’ शोमध्ये कपूर यांच्या लंचमध्ये फिश करी, जंगल मटण आणि पाया सारखे पदार्थ असल्याचं दिसत होतं. या व्हिडिओमध्ये रणबीरचा चुलत भाऊ अरमान जैन माशाचे कालवण आणि भात तसंच मटण करी कपूर कुटुंबाला वाढताना दिसत आहे. रणबीर ,नीतू कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैन आणि सैफ अली खान यांच्यासोबत जेवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. रणबीरने भुमिकेसाठी मांसाहार सोडल्याचं खोट बोलल्याचं लक्षात आल्यानंतर युजर्ने नाराजी दर्शवत त्याला ट्रोल केलं आहे. रणबीरने फक्त चित्रपटासाठी हा स्टंट केल्याचं बोललं जात आहे.
युजर्सच्या कमेंट्स
एका युजरने म्हटलं आहे की, “मला वाटते की बॉलीवूड कलाकारांच्या पीआर टीमना काढून टाकले पाहिजे, विशेषतः आरके आणि आलिया भट्ट यांच्या. अशा मूर्ख गोष्टी पोस्ट करण्यापूर्वी ते त्यांच्या क्लायंटच्या मागील व्हिडिओंवर कोणतेही संशोधन करत नाहीत”, तर एकाने म्हटलं, “एखाद्या भूमिकेसाठी मांसाहारी आणि अल्कोहोल सोडल्याचा दावा करण्याची गरज का होती? कोणी विचारले होते का? आदिपुरुष चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रभासने कधी अशी विधाने केली होती का? सर्वांना माहिती आहे की तो मांसाहारी आणि मद्यपी आहे.” एकाने कमेंटमध्ये लिहिले, “रणबीर तू खोटारडा आहेस, एक ढोंगी आहे.” अशा पद्धतीने नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे.
