ऋषी-राजीवच्या निधनानंतर एकटे पडले रणधीर कपूर, वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय!

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषी-राजीवच्या निधनानंतर एकटे पडले रणधीर कपूर, वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय!
रणधीर कपूर
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 11:04 AM

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याक्षणी त्यांची प्रकृती अधिक चांगली आहे. रणधीर यांच्या कर्मचारी वर्गातील 5 सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनाही या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान रणधीर यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ते ज्या ठिकाणी मोठे झाले, ते त्यांचे वडिलोपार्जित चेंबूरचे घर लवकरच विकण्यात येणार आहे. रणधीर यांना यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, भाऊ राजीव यांच्या मृत्यूनंतर मला एकटे वाटत आहे आणि आता त्यांना कुटुंबासमवेत राहायचे आहे (Randhir Kapoor decided to sell his ancestral house).

रणधीर म्हणाले, ‘राजीव बहुतेक वेळ माझ्याबरोबरच राहत असे. त्याचे पुण्यात एक घर होते, परंतु तो येथे बरेच दिवस मुंबईत राहत होता. राजीवच्या मृत्यूनंतर मला एकटेपणा जाणवत होता, म्हणून मला वाटले की आता मी माझ्या कुटूंबाच्या जवळ असावे.’

भावा-बहिणींना द्यावे लागणार पैसे!

आपल्या वडिलोपार्जित घराविषयी सांगताना रणधीर म्हणाले की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, मी या घरात मला जेवढे वाटेल तेवढे दिवस राहू शकतो. परंतु, ज्या दिवशी मी हे घर विकेन, तेव्हा त्यातून मिळणारे पैसे मला ऋषी, राजीव, ऋतु आणि रीमा यांच्यात वाटून घ्यावे लागतील.’

रणधीर यांनी यापूर्वीच वांद्रे येथे घर विकत घेतले आहे आणि तो आता पूर्णपणे तयार झाले आहे. रिपोर्ट्सनुसार रणधीर लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहेत (Randhir Kapoor decided to sell his ancestral house).

भावाच्या मालमत्तेवर केवळ आमचा अधिकार!

दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले की, राजीव कपूरच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात. आमच्याकडे त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नाहीत. आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, ती सापडली नाही. त्यांना घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यापासून सूट देण्यात यावी. यावर न्यायाधीश गौतम म्हणाले की, घटस्फोटाच्या आदेशाची कागदपत्रे सादर न करण्यासाठी सूट देण्यास न्यायालय तयार आहे, परंतु स्वीकृतीपत्र आधी दिले जावे. या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेवरील विवाद सोडवण्याच्या सुनावणीदरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेची आवश्यकता असल्यास त्यांनी राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र न्यायालयात आणली पाहिजेत, ज्यात राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची ऑर्डर असली पाहिजे.

(Randhir Kapoor decided to sell his ancestral house)

हेही वाचा :

Birth Anniversary | केवळ 15 हजारांत बनला होता भारतातील पहिला चित्रपट, दादासाहेब फाळके स्वतःचे बनले होते अभिनेता!

Randhir Kapoor | अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.