AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा

बाॅलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षित हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावर सक्रिय असून माधुरीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटे बाॅलिवूडला दिली आहेत.

त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा
madhuri dixit
| Updated on: Apr 06, 2024 | 1:09 PM
Share

बाॅलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षितची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच माधुरी दिसते. नुकताच माधुरी दीक्षित हिच्याबद्दल व्हिलन रंजीत यांनी एक अत्यंत मोठा किस्सा सांगितला. अभिनेते रंजीत यांनी 500 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

500 पैकी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये रंजीत यांनी खलनायकाची भूमिका करताना दिसले. नुकताच रंजीत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना रंजीत हे दिसले. रंजीत म्हणाले की, प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात मला माधुरी दीक्षितसोबत सीन शूट करायचा होता. मात्र, तो सीन शूट करण्याच्या अगोदर माधुरी रडायला लागली.

हेच नाही तर तिने माझ्यासोबत काम करण्यास नकारही दिला. मुळात म्हणजे मला काय घडत आहे हेच माहिती नव्हते. चित्रपटाच्या सेटवर माधुरी येत नव्हती. या चित्रपटात माधुरी एका गरीब व्यक्तीची मुलगी होती. या चित्रपटात मला माधुरीसोबत छेडछाड करायची होती. मी विचार करत होतो की, माधुरी अजून का नाही आली.

मला माहितीच नव्हते की, काय घडत आहे. त्यानंतर शेवटी माधुरीने ऐकले आणि ती सेटवर पोहचली. त्यावेळी मला फाइट मास्टर वीरू देवगनने सांगितले की, एकाच टेकमध्ये संपूर्ण सीन शूट करायचा आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात खराब नसतात हे देखील माधुरी दीक्षितला समजवण्यात आले. त्यावेळी तिने या सीनसाठी होकार दिला.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत मिथून चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला. आता रंजीत यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रंजीत यांची खलनायक म्हणून ओळख आहे. रंजीत यांनी खूप मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रंजीत यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.