रणवीर आणि कपिल देव यांचा निळ्या जर्सीतला फोटो बघितलात का?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा ‘83’ साठी खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमात तो माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्व कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. त्यासाठी त्याला खुद्द कपिल देव हेच प्रशिक्षण देत आहेत. ‘83’ हा सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्व चषकामधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. …

Ranveer Singh, रणवीर आणि कपिल देव यांचा निळ्या जर्सीतला फोटो बघितलात का?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा ‘83’ साठी खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमात तो माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्व कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. त्यासाठी त्याला खुद्द कपिल देव हेच प्रशिक्षण देत आहेत. ‘83’ हा सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्व चषकामधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.

या सिनेमासाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यानचे धर्मशाळा येथील काही फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर आणि कपिल देव हे दोघेही निळ्या जर्सीत दिसत आहेत. फोटोमध्ये कपिल देव हे रणवीरला काही टिप्स देताना दिसत आहेत.

रणवीरने फोटो शेअर करत “वादळ बनण्याच्या तयारीत. कपिल देव. लेजेंड. प्रवास सुरु”, असे कॅप्शन दिले आहे. या सिनेमात रणवीर व्यतीरिक्त पंकज त्रिपाठी, साकिब सलीम आणि चिराग पाटील आहेत. या सिनेमाचं शूटिंग मे महिन्यापासून सुरु होईल. सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारण्याआधी रणवीर सिंग त्यासाठी खूप मेहनत करतो आहे. त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट शिकतो आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *