Dhurandhar Cast Net Worth : रणवीर-संजय, माधवन, अर्जुन की अक्षय खन्ना…‘धुरंधर’चा कोणता अभिनेता सर्वात श्रीमंत ?
Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंह चा 'धुरंधर' हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. नुकताच त्याचा 4 मिनिटांचा अतिशय उत्कंठावर्धक असा ट्रेलर रिलीज झाला. आदित्य धरच्या या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला असून त्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. पण या चित्रपटाच्या कास्टपैकी सर्वात श्रीमंत कोण माहीत आहे का ?

Dhurandhar Cast Net Worth : येत्या 5 डिसेंबरला ‘धुरंधर’ (Dhurandhar) हा बहुचर्चित चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणाकर आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला. 4 मिनिटांच्या या तूफानी ट्रेलरने सर्वांना वेड लावलं आहे. रणवीर सिंगसह इतर 4 अभिनेत्यांनीही केलेलं काम पाहून सगळेच स्तिमित झालेत. पण या संपूर्ण चित्रामागील खरी मेहनत आदित्य धर यांची होती, असा चित्रपट तयार करण्याचं स्वप्न त्याने पाहिलं आणि पूर्णही केलं. या चित्रपटात सर्वाधिक फी तर रणवीर सिंगने घेतली आहे, पण ‘धुरंधर’ टीमचा कोणता स्टार सर्वात जास्त श्रीमंत आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? चला सर्वांचं नेटवर्थ जाणून घेऊया.
ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आदित्य धर यांनी खुलासा केला की सर्व कलाकारांनी अनेक तास शूटिंग केले. अलिकडेच, रणवीर सिंगला चित्रपटासाठी 50 कोटी मानधन देण्यात आल्याचे वृत्त समोर आले. तर चित्रपटाचे बजेट 280कोटी आहे. या चित्रपटासाठी संजय दत्तला 10 कोटी, तर अर्जुन रामपालला 1 कोटी रुपये मिळाले. तर आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांना प्रत्येकी 3 कोटी रुपये मिळाले. पण या सगळ्या कलाकारांमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे?
कोणाकडे आहे सर्वात जास्त संपत्ती ?
1. अर्जुन रामपाल: या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अर्जुनपासून झाली होती, तर इथेही त्याच्यापासून सुरुवात करूया, जो मेजर इक्बालची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये इतकी आहे. 2001 साली “प्यार इश्क और मोहब्बत” या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याआधी त्याने मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
2. संजय दत्त : या चित्रपटातील सर्वात भयानक खलनायक म्हणजे एसपी चौधरी असलम. ट्रेलरमध्ये त्याची प्रभावी शैली चांगलीच गाजली आहे. संजय दत्तने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून सातत्याने धुमाकूळ घातला आहे, त्यापैकी काही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. तो त्याच्या कामासाठी मोठी फी देखील आकारतो. 1981 साली आलेल्या “रॉकी” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या संजय दत्ताल अजूनही खूप मागणी आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 295 कोटी आहे.
3. अक्षय खन्ना : अक्षय खन्नाने या वर्षी विकी कौशलच्या “छावा” चित्रपटात औरंगजेबाची भूमिका उत्तम साकारून आधीच मोठ्या पडद्यावर जाळ काढला आहे. आता तो धुरंधरमध्ये देखील एका गुंडाची भूमिका साकारत आहे. रहमान द डकैतीची त्याची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, कारण ट्रेलरमध्ये तो खूपच भयानक दिसत होता. 1997 साली “हिमालय पुत्र” या चित्रपटातून त्याने पदार्पण केले, परंतु त्याची कारकीर्द अगदी ग्रेट चालली नाही, पण आजही तो अनेकांचा लाडका अभिनेता आहे. रिपोर्टनुसार, अक्षयची एकूण संपत्ती अंदाजे 167 कोटी रुपये आहे.
4. रणवीर सिंह : धुरंधरमध्ये रणवीर सिंह हा अगदी लीड रोलमध्ये दिसणार असून त्याचा टेरिफिक अंदाज अनेकांना आवडलाय. 2010 साली आलेल्या ‘बँड बाजा बारात’ मधून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. 15 वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत असलेला रणवीर संपत्ती 362 कोटी असल्याचे वृत्त आहे. तो एकेका चित्रपटासाठी 40 कोटींची फी घेतो, पण धुरंधरसाठी त्याने सर्वाधिक, 50 कोटी फी आकारली आहे.
5. आर माधवन: उत्कृष्ट अभिनया निखळ हसू आणि लूक्स यांनी आर.माधवन याने प्रेक्षकांचे मन वारंवार मन जिंकले आहे. धुरंधर या चित्रपटात तो अजय सन्याल या भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्याची शैली आणि संवाद यांना चांगलीच पसंती मिळाली. 2001 साली आलेल्या “रहना है तेरे दिल में” या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण त्या आधी साऊथ इंडस्ट्रीत त्याचा खूप बोलबाला होता. इतकी वर्ष लोकांना भुरळ घालणाऱ्या माधवनची संपत्ती 115 कोटी असल्याचे वृत्त आहे.
