‘मेल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत रणवीर शौरीला केले ट्रोल, अभिनेत्याने दिले चोख प्रत्युत्तर!

अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) याला अलीकडेच एका वापरकर्त्याने कंगना रनौत (Kangana Ranaut) हीचे ‘मेल व्हर्जन’ म्हणत ट्रोल केले आहे. रणवीरने जेव्हा राहुल गांधींबद्दल ट्विट केले तेव्हा त्याला ही प्रतिक्रिया मिळाली.

‘मेल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत रणवीर शौरीला केले ट्रोल, अभिनेत्याने दिले चोख प्रत्युत्तर!
रणवीर शौरी आणि कंगना रनौत

मुंबई : अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) याला अलीकडेच एका वापरकर्त्याने कंगना रनौत (Kangana Ranaut) हीचे ‘मेल व्हर्जन’ म्हणत ट्रोल केले आहे. रणवीरने जेव्हा राहुल गांधींबद्दल ट्विट केले तेव्हा त्याला ही प्रतिक्रिया मिळाली. वास्तविक, रणवीर शौरी यांनी राहुल गांधींबद्दल ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, ‘राहुल गांधींचे कौतुक केले पाहिजे कारण की त्यांनी संपूर्ण रॅली रद्द केली आहे. जेव्हा त्यांना माहित आहे की तिथे विजयाची कोणतीही आशा नाही (Ranvir Shorey gives an answer to trollers on social media).

रणवीरच्या या ट्विटवर एका वापरकर्त्याने उत्तर दिले की, ‘तू अजूनही जिवंत कसा आहेस? म्हणजे कसे? पाठीचा कणा नसलेला माणूस जगू शकतो? ‘ यावर अभिनेताने उत्तर दिले की, ‘गिधाडाला टोमणे मारल्यामुळे गाय मरत नाही’. रणवीरच्या या टिप्पणीवर युजरने अशी पुन्हा अशी टिप्पणी केली की, ‘तू कंगना रनौतचा मेल व्हर्जन, वेडा आणि मूर्ख आहेस.’

गेल्या वर्षी जेव्हा कंगनाने बॉलिवूडविषयी काही खुलासे केले होते, तेव्हा रणवीर शौरी कंगना रनौतबद्दल बोलला होता. रणवीर म्हणाला होता की, लोक तिला का शांत करत आहेत? यात काही नवीन नाही, जरी ती कधीकधी अधिक बोलते. पण माझा मुद्दा असा आहे की हे सर्व नवीन नाही. लोक या गोष्टींवर विश्वास का ठेवत नाहीत?

पाहा ट्विट

(Ranvir Shorey gives an answer to trollers on social media)

ड्रग्जविषयी टिप्पणी

एका मुलाखतीत रणवीरने बॉलिवूडमधील ड्रग्जविषयी वादग्रस्त वक्तव्य होते. तो म्हणालेला की, ‘मला वाटते की बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा ट्रेंड जितका समाजात आहे तितकाच आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या आणि नसलेल्या बहुतेक पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा सर्रास वापर होताना मी पाहिले आहे.’(Ranvir Shorey gives an answer to trollers on social media)

इतकेच नाही तर तो म्हणाला की , ‘भारतात गांजा कायदेशीर झाला पाहिजे, असे मत असणाऱ्यांच्या पक्षात मी आहे. बर्‍याच देशांमध्ये तो कायदेशीर केला गेला आहे.’ पुढे तो म्हणाले, ‘गांजा संबंधित कायदे फार जुने आहेत आणि आता ते बदलण्याची गरज आहे.’

स्टार किड्सबद्दल बोलताना म्हणाला…

त्याच वेळी जेव्हा जेव्हा त्याला विचारले गेले की, त्याची जागा आता एखाद्या स्टार किडने घेतली आहे का?, तेव्हा तो म्हणाला की, अशा गोष्टी पडद्यामागून घडतात. परंतु हे खरे आहे की बर्‍याच वेळा असे घडले आहे की, स्क्रिप्ट्स मला देण्यात आल्या, पण प्रत्यक्षात काम मात्र दुसराच अभिनेता करताना दिसला. काही वेळा ते स्टार किड्स देखील होते. तो म्हणाले, ‘कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी हा काळ जास्त चांगला आहे आणि त्याचे कारण ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. हे मध्यम नवीन कलाकारांना संधी देत ​​आहे.’

(Ranvir Shorey gives an answer to trollers on social media)

हेही वाचा :

PHOTO | शाहरुखच्या लेकीने शेअर केला ‘बेडरूम मिरर सेल्फी’, सुहानाच्या फिटनेसचं चाहत्यांकडून कौतुक!

भारताची आबादी वाढतेय, तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा, कंगना रनौतचा हल्लाबोल!

Published On - 12:36 pm, Wed, 21 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI