AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna: माझं वागणं ओव्हरॲक्टिंग वाटत असेल तर..; ट्रोलर्सला रश्मिका मंदानाने सुनावलं

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा चाहतावर्ग मोठा असला तरी अनेकजण तिच्या वागण्यावरून ट्रोलसुद्धा करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने या ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

Rashmika Mandanna: माझं वागणं ओव्हरॲक्टिंग वाटत असेल तर..; ट्रोलर्सला रश्मिका मंदानाने सुनावलं
Rashmika MandannaImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2026 | 11:21 AM
Share

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या आगामी ‘राणाबली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रश्मिकाला तिच्या स्वभावावरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. काही सोशल मीडिया युजर्स तिच्या प्रेमळ आणि उत्साही वागण्याला ‘ओव्हरॲक्टिंग’ किंवा ‘क्रिंज’ म्हणतात. यावर रश्मिकाने कोणताही आडपडदा न ठेवता तिची भूमिका स्पष्ट केली. रश्मिकाने सांगितलं की, चांगुलपणा ही कमजोरी नाही, असं ती मनापासून मानते. आजूबाजूला आधीच खूप नकारात्मकता आहे, त्यामुळे आपण आपल्या परीने सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे तिच्या प्रेमळ वागण्याला कोणी ‘ओव्हरॲक्टिंग’ म्हटलं तरी त्याचा तिला फारसा फरक पडत नाही.

‘मी अशीच आहे आणि मला बदलायचं नाही’

रश्मिकाच्या मते प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव आवडेलच असं नाही. त्यामुळे काही लोकांना तिचं वागणं आवडत नसेल तर ती त्यासाठी स्वतःमध्ये बदल करणार नाही. ती जशी आहे, तशीच राहण्यात तिला आनंद आहे. विशेष म्हणजे तिचं प्रेमळ वागणं केवळ चाहत्यांसमोरची प्रतिमा नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं. रश्मिकाने हेही सांगितलं की, इतरांना खुश करण्यासाठी ती स्वतःला बनावटपणे बदलू शकत नाही. तिच्या या स्वभावामुळे ती स्वतः, तिचं कुटुंब, मित्र आणि जवळचे लोक आनंदी असतील, तर तिच्यासाठी तेच महत्त्वाचं आहे.

विजय देवरकोंडानेही ट्रोलिंगवर भाष्य केलं

रश्मिकाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा यानेही यावेळी सोशल मीडिया ट्रोलिंगवर भाष्य केलं. अनेकदा कलाकार किंवा प्रसिद्ध व्यक्तींबाबत सोशल मीडियावर विशिष्ट मत तयार केलं जातं आणि त्यामागे ठरावीक ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याची यंत्रणा काम करत असल्याचं विजयने म्हटलं. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलेलंही नसताना तिच्या स्वभावाबद्दल ठाम मत कसं बनवता येईल, असा सवाल त्याने उपस्थित केला.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा लवकरच ‘राणाबली’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. राहुल संकृत्यायन दिग्दर्शित हा पीरियड ॲक्शन ड्रामा असून 19व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर त्याची कथा आकाराला येते. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रश्मिका आणि विजयने यापूर्वी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’मध्ये एकत्र काम केलं आहे. लग्नानंतर पडद्यावर त्यांची पुन्हा एकत्र येणारी जोडी पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.

Follow Us
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...