‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रश्मिका मंदानाने अल्लू अर्जुनची माफी का मागितली?
'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रश्मिका मंदानाने अल्लू अर्जुनची माफी मागितली आहे. त्याबद्दलची एक भावनिक पोस्टही तिने सोशल मीडियावर लिहिली आहे. पण रश्मिकाने अल्लू अर्जुनची माफी का मागितली?

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर ठरला त्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतरही हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाच्या यशाचा आनंदही टीमही साजरा करत आहे. नुकतेच ‘पुष्पा 2’ च्या टीमने एक आभार सभा आयोजित केली. यावेळी ‘पुष्पा2’ च्या टीममधील सर्व कलाकारांनी उपस्थिती दर्शवला होती. पण या कार्यक्रमाला अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मात्र नव्हती.
‘पुष्पा 2’ च्या आभार कार्यक्रमाला रश्मिकाची गैरहजेरी
रश्मिकालाही या कार्यक्रमासाठी हजेरी लावायची होती मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे तिला या चित्रपटाला येणं शक्य झालं नसल्याचं सांगित चित्रपटाच्या टीमची माफी मागितली. एवढंच नाहीतर तिने यात सर्वांची नावे लिहिली आहेत. ज्यात अल्लू अर्जुनच्या नावाचाही तिने उल्लेख आवर्जून केला आहे.
रश्मिकाने अल्लू अर्जुन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासाठी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. त्यात तिने सांगितले आहे की वैयक्तिक कारणांमुळे ती ‘पुष्पा 2’ च्या आभार कार्यक्रमाचा भाग होऊ शकली नाही.
View this post on Instagram
रश्मिका पोस्टमध्ये काय म्हणाली?
रश्मिका मंदानाने ‘पुष्पा 2’ च्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी एक इंस्टा पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणाली की, “मी काल ‘पुष्पा 2’ च्या आभार कार्यक्रमाचा भाग होऊ शकले नाही. म्हणून मी चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन, दिग्दर्शक सुकुमार आणि प्रॉडक्शन हाऊस मैथ्री प्रॉडक्शनचे आभार मानू इच्छितो आणि त्यांची माफीही मागते. चित्रपटाच्या टीमने कठोर परिश्रम केले आहेत आणि आम्हा सर्वांना एक उत्कृष्ट कलाकृती दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छिते. आणि श्रीवल्लीचे माझ्या हृदयात नेहमीच एक खास स्थान राहील.”
“टीम होती म्हणून आम्ही हे करू शकलो…”
रश्मिकाने पुढे लिहिले की, ‘आम्ही या चित्रपटासाठी आमचे सर्वस्व दिले. आमची टीम खूप छान होती. आमच्याकडे दिग्दर्शन टीम, प्रोडक्शन टीम, कॅमेरा, लाईट्स, मेकअप, हेअर, कॉस्ट्यूम, डान्सर आणि कलाकार देखील होते. ही सर्व टीम होती म्हणून सगळं छान निभावलं.” असं म्हणत तिने सर्वांचे कौतुक केलं आहे आणि सर्वांची माफीही मागितली आहे.
रश्मिका मंदाना बद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या विकी कौशलसोबत तिच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती चित्रपटाच्या कलाकारांसह मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका पाहण्यासाठीही प्रेक्षक तेवढेच आतुर आहे.