रेखा यांचा आलिशान बंगला ‘बसेरा’, समुद्र किनारा, सर्वत्र हिरवळ, 100 कोटींचा आशियाना

Rekha | रेखा यांच्या बंगल्याच्या फोटोंवरून हटणार नाही नजर, 100 कोटींच्या घरात राहतात एकट्याच, बंगल्या समोर समुद्र किनारा, सर्वत्र हिरवळ, पाहून म्हणाल..., रेखा यांच्याकडे आज पैसा, प्रसिद्धी संपत्ती सर्वकाही आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या...

रेखा यांचा आलिशान बंगला 'बसेरा', समुद्र किनारा, सर्वत्र हिरवळ, 100 कोटींचा आशियाना
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 8:23 AM

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा इंडस्ट्रीचा भाग असून आज त्या रॉयल आयुष्य जगत आहेत. रेखा मुंबईतील सर्वात पॉश भागात राहातात. त्यांच्या बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असं आहे. लांबून लोकं रेखा यांचा बंगल्या पाहण्यासाठी येत असतात. 100 कोटी रुपयांचा रेखा यांचा बंगला मुंबईची ओळख आहे… असं म्हणायला हरकत नाही. समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यासमोर सर्वत्र हिरवळ आहे. शिवाय रेखा यांनी अनेक महागड्या वस्तूंनी स्वतःचं घर सजवलं आहे.

रेखा यांच्या घराच्या एन्ट्रीवर मोठ्या छत्रीसारखी डिझाईन दिसत आहे. ती डिझाईन रेखा यांच्या ‘उमराव जान’ सिनेमाची आठवण करून देते. रेखा यांच्या घराच्या काही भिंती पांढख्या आहेत. प्रकाश येण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या आहेत. घराच्या बाहेरील दृष्य देखील फार आकर्षक आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या घराची चर्चा रंगली आहे.

रेखा यांचा बंगला अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्यापुढे आहे. रेखा यांच्या बंगल्याकडे वळून पाहाण्याची देखील कोणाला परवानगी नाही. रेखा यांचे काही मित्र फक्त त्यांच्या बंगल्यात प्रवेश करू शकतात. रेखा यांच्या स्टाफशिवाय बंगल्यात कोणालाच जाण्याची परवानगी नाही.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. रेखा यांच्या आईचं नाव पुष्पवल्ली तर वडिलांचं नाव जॅमिनी गणेशन असं होतं. दोघे देखील झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकार होते. पण रेखा यांना वडिलांचं प्रेम कधीच मिळालं नाही. रेखा यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.

रेखा यांना 9 वीत असताना शिक्षण सोडून अभिनयाकडे वळावं लागलं. कारण होतं आईवर असलेलं कर्ज… आईवर असलेलं कर्ज आणि घर चालवण्यासाठी रेखा यांनी शिक्षण सोडून अभियन करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, रेखा यांना अभिनयात रस नव्हता. त्यांना तर सुखी संसार करायाचा होता.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर रेखा यांचा प्रवास सोपा नव्हाता. रेखा यांनी बी ग्रेड सिनेमांमध्ये देखील काम केलं. सिनेमांमध्ये काम करत असताना त्यांच्या खासगी आयुष्याच्या देखील चर्चा रंगल्या. अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली. रेखा यांचं लग्न देखील झालं होतं. पण लग्नाच्या सहा महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीने स्वतःचं आयुष्य संपवलं. आज रेखा यांच्याकडे पैसा, संपत्ती, प्रसिद्धी सर्वकाही आहे, पण कुटुंब नाही. वयाच्या 69 व्या वर्षी देखील एकट्याच आहेत.

Non Stop LIVE Update
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.