अमिताभ बच्चन किंवा विनोद मेहरा नाही तर हा अभिनेता होता रेखाचं पहिलं प्रेम; पाहाताच पडली प्रेमात
रेखाच्या आयुष्यातील हा एक असा अध्याय आहे, जो फार कमी लोकांना माहित आहे. अमिताभ बच्चन किंवा विनोद मेहरा नाही तर हा अभिनेता रेखाचं पहिलं प्रेम होता.

बॉलिवूडची आयकॉनिक अभिनेत्री रेखा तिच्या अप्रतिम सौंदर्य आणि अभिनयासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिच्या चित्रपटांइतक्याच तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या कहाण्याही गाजल्या. रेखाच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सर्वांना माहिती असल्या तरी काही अशा कहाण्या आहेत ज्या फारशा समोर आल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला रेखाच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीबाबत सांगणार आहोत. कारण ती व्यक्ती रेखाच्या आयुष्यातील तिचं पहिलं प्रेम होतं. ज्याबद्दल खरंच कोणाला फारसं माहित नाही.
रेखाचे पहिले प्रेम कोण होते?
रेखा जेव्हा ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती, तेव्हा तिच्या आयुष्यात साजिद खानची एन्ट्री झाली. साजिद हे प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान यांचा दत्तक मुलगा होते. मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ या सुपरहिट चित्रपटात साजिद यांनी छोट्या बिरजूची भूमिका साकारली होती. साजिद खूपच आकर्षक आणि बुद्धिमान होते. मेहबूब खान यांनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले होते. परत आल्यानंतर साजिद एक परिपक्व आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा माणूस बनले होते. रेखाने जेव्हा साजिदला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा ती त्याच्या आकर्षक झाली. पहिल्यांदा पाहाताच रेखा त्यांच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर रेखा आणि साजिद बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले, ज्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरली.
- rekha first love
अभिनेत्याचं आयुष्य आणि करिअर
साजिद यांचा जन्म मुंबईतील एका झोपडपट्टीत झाला होता, परंतु मेहबूब खान यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. ‘मदर इंडिया’मधील छोट्या बिरजूच्या भूमिकेने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर साजिदने काही हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रेखा आणि साजिद काही काळ मीडियामध्ये एक जोडी म्हणून कायम चर्चेत राहिली आहे. पण नंतर त्यांचे नाते तुटले. असे सांगितले जाते की साजिदच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीची एन्ट्री झाली अन् हे नाते संपलं. वयाच्या 70 व्या वर्षी, साजिद खान यांचे कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. रेखाच्या आयुष्यातील हा एक असा अध्याय आहे, जो फार कमी लोकांना माहित आहे.
